कोरेगाव शहरातील”श्री स्वामी समर्थ मंदिराचा” भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

कोरेगाव शहरातील”श्री स्वामी समर्थ मंदिराचा” भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न
पुसेगाव—प्रतिनिधी
याबाबत अधिक माहिती अशी की कोरेगाव( जिल्हा सातारा) या शहरांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची स्थापना सन 2000 मध्ये करण्यात आली. त्यापूर्वी सन 1984 सालापासून कोरेगाव येथे श्री स्वामी समर्थ सेवेचे कामकाज सुरू होते. सन 1998 मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी एक जुनी 180 वर्षाची इमारत, कोरेगाव येथील भैरवनाथ मंदिर परिसरात खरेदी करण्यात आली. या इमारतीत श्री स्वामी समर्थ मंदिराचे पूजापाठ सुरू करण्यात आले .याच इमारतीत सन 2000 मध्ये परम पूज्य पुंडे महाराज यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली .या मंदिरामध्ये गेली 23 वर्षे सर्व भाविक पूजा पाठ करीत आहेत.मात्र मंदिराची इमारत मोडकळीस आल्याने ,सर्व स्वामी भक्तांनी नवीन मंदिर उभारणीचा संकल्प केला. सर्व स्वामी भक्तांनी मंदिराच्या उभारणीसाठी कोरेगाव शहर आणि परिसरातून देणग्या गोळा केल्या. 15 नोव्हेंबर 2023 रोजी स्वामीभक्त गजानन उंबरदंड आणि स्वामी सेवा समितीचे पुजारी संजय मधुकर जोशी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी मोठ्या संख्येने कोरेगाव शहरातील महिला आणि पुरुष स्वामीभक्त उपस्थित होते.