आपला जिल्हा

बाळाचा गुदमरतोय श्वास… समाजाकडून मदतीची आस..!

बाळाचा गुदमरतोय श्वास… समाजाकडून मदतीची आस..!

मृत्यू त्याचा पाठलाग करतोय…आणि त्याला वाचवण्यासाठी रिकाम्या हातांनी मायबापाची धडपड सुरूय…!

Download Aadvaith Global APP

वारणावती : आष्पाक आत्तार

गेल्या महिनाभरापासून त्याचा श्वास गुदमरतोय. जीवाच्या आकांताने तो तडपतोय. आई वडील जीवाचं रान करताहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे रोज नवनवीन हॉस्पिटलच्या चकरा मारत आहेत. मात्र त्यांना यश येत नाही. त्यात आर्थिक परिस्थिती हालाखीची दिवसभर काबाडकष्ट करावं तेव्हा त्यांच्या हाता तोंडाचा मेळ होतो. अशी परिस्थिती असतानाही मित्रमंडळी सग्या सोयऱ्यांकडून पै पै गोळा करून बाळाच्या वैद्यकीय खर्चासाठी आतापर्यंत दीड दोन लाख खर्च केले.पुढचा खर्च पेलवत नाही. आणि बाळाचं तडपण थांबत नाही. अशा परिस्थितीत करायचं काय ? म्हणून दाम्पत्य हतबल झाल आहे.
मृत्यू त्याचा पाठलाग करतोय आणि त्याला वाचवण्यासाठी रिकाम्या हातांनी मायबापाची धडपड सुरूय.ही दुर्दैवी कहाणी आहे अहमद सलीम आवटी या अवघ्या सहा महिन्याच्या बाळाची आणि त्याच्या आईवडिलांची.

सलीम व रब्बना हे आवटी दांपत्य कराडमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहतंय. पत्नी रब्बना घरकाम करते. तर सलीम मोलमजुरी करून आपला संसार चालवतो. सलीम ला आई वडील नाहीत. सहा महिन्यापूर्वी अहमद या गोंडस बाळाने आवटी दांपत्याच्या पोटी जन्म घेतला. बाळाच्या आगमनामुळे घरचं वातावरणच बदलून गेलं. मात्र चार महिन्यातच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. गेल्या महिनाभरापासून ते कायम आहेत.

एके दिवशी बाळाला ताप आला म्हणून एका बालरोग तज्ञाला दाखवलं. त्यांनी कृष्णा चॅरिटेबलला ऍडमिट करायला सांगितलं. पंधरा दिवस इलाज झाला. मात्र बाळात काही फरक जाणवेना. बाळाचा इलाज इथे कोठेच होणार नाही त्याला मुंबईला हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.बाळाला घेऊन हे दांपत्य मुंबईला गेलं. वाडिया हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस राहील. तिथेही फारसा फरक पडला नाही. डॉक्टरांनी आमचा जो इलाज होता तो केला आहे. इथून पुढे इलाज नाही त्याचं आणि तुमचं नशीब असं म्हणत आता बाळाला घरीच न्या म्हणून डिस्चार्ज दिला.

नाका तोंडात पाईप असणार बाळ घरी आणून करायचं तरी काय ? त्याला ना काही गिळता येतंय ना श्वास घेता येतोय. इथे जास्त दिवस ठेवाल तर बाळाला इन्फेक्शन होईल हेही सांगण्यात आलं त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने हे कुटुंब पुरतच हतबल झालं.

जवळच असणाऱ्या एस.आर.सी. सी. हॉस्पिटलला बाळाचा इलाज होईल कोणीतरी सांगितलं. मात्र पैसे खूप लागतील हेही बजावलं.दोन वेळच्या जेवणाला महाग झालेले हे दांपत्य देवावर विश्वास ठेवून पुन्हा परतलं. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे पाईप मधूनच बाळाला दोन-तीन थेंब देऊ लागलं. दोन दिवस कसेबसे गेले. बाळ पुन्हा तडपायला लागलं. पुन्हा बाळाला घेऊन दाम्पत्य कोल्हापूरला गेलं तिथं बालरोग तज्ञांनी साडेनऊ हजाराचे दहा इंजेक्शन लिहून दिले.

प्रत्येक डॉक्टरांचा वेगवेगळा सल्ला त्यामुळे काय निर्णय घ्यायचा हेच त्यांना कळेना. पुन्हा ते बाळाला घेऊन मिरजला आले. येथील डॉक्टरांनी तात्काळ बाळाला आय.सी.ओ. मध्ये हलवा म्हणून सांगितले. वेगवेगळ्या डॉक्टरांनी या बाळावर इलाज कराव लागेल तेव्हा कुठे नेमकं निदान लागेल आणि यश मिळेल. पण त्याचीही खात्री नाही असं सांगितलं. एवढा इलाज करूनही बाळात काही फरक जानवेना आणि त्याचं तडपण बघवेना. त्यामुळे या दांपत्याने खिशात दमडी नसतानाही राजधानीतील एस. आर. सी. सी. गाठायचं ठरवलं.

लाखो रुपयांचा खर्च ऐकून दवाखान्याच्या दारातून परत आलेले हे दांपत्य पुन्हा बाळाला घेऊन त्याच ठिकाणी गेलं आहे. इथे प्रवेशासाठी केस पेपरची फीच 25 हजार रुपये आहे. ती भरायला नाही म्हणून कुणीतरी मदत करेल या आशेवर तिथेच बसून आहे. पुढे काय होईल माहित नाही. पण समाजाने दातृत्व दाखवलं तर या मातेचे मातृत्व जिवंत राहील . गरज आहे समाजातील मदतीच्या हातांची जी एका बाळाचं आयुष्य पुन्हा उभारेल.बापाला पितृत्व आणि आईला मातृत्व मिळवून देईल.

 

बाळाला ताप आला होता. तो मेंदूत गेला आहे. त्यामुळे मेंदू विकार झाला आहे. त्याच्या तपासण्या सुरू आहेत. मात्र अजून निदान लागलेलं नाही . त्यासाठी मणक्यातून पाणी काढणे. रक्त तपासणे, मेंदूची तपासणी करणे महागडे इंजेक्शन आणि औषधे घेणे. अत्यंत गरजेचे आहे यातूनही यश मिळाले तर भविष्यात पुन्हा त्याला व्यंग येऊ नये म्हणून आत्ताच त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. लाखो रुपयांचा हा खर्च या गरीब दाम्पत्याला पेलणारा नाही. समाजाने मदतीचा हात देऊन आमच्या बाळाला जीवदान द्यावं अशी आर्त आणि अर्थ विनवणी आवटी दांपत्याने केली आहे.*

मदतीसाठी खाते नंबर
25022158886
IFSC code MAHB0000220
रब्बना निसार मुलाणी
9623340884 गूगल पे

मुख्य संपादक

सामाजिक सांकृतिक राजकिय कृषी व खेळ जगत बातम्यांचे व्यासपीठ भागातील बातम्या पाहण्यासाठी youtube channel==lokpravah news संपादक -- महेश तांबवेकर = 7709797534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button