विज्ञान नाट्योत्सवात भुतेश्वर विद्यामंदिर द्वितीय
खटाव तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा; कलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक

विज्ञान नाट्योत्सवात भुतेश्वर विद्यामंदिर द्वितीय
खटाव तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा; कलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक
मायणी.. प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव खटाव तालुका स्तरीय स्पर्धेत अंबवडे ( ता खटाव ) येथील भुतेश्वर विद्यामंदिरच्या कलाकारांनी सादर केलेल्या स्वच्छतेची गाणी गाऊ राणी या नाटिकेस दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत खटाव पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वडुज येथील ट्रिनिटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित नाट्य स्पर्धेत तालुक्यातील सर्व नामांकित माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत भूतेश्वर विद्यामंदिर अंबवडेच्या विद्यार्थ्यांनी सर्वासाठी स्वच्छता या विषयास अनुसरून स्वच्छतेची गाणी गाऊ राणी ही नाटिका सादर केली. आरोग्यासाठी सर्वांगीण स्वच्छता कशी आणि किती महत्त्वाची आहे हे नाटिकेतून सादर करण्यात आले. खेड्यापाड्यातील, वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद असे सादरीकरण केल्याने भुतेश्वर विद्या मंदिरास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. नाटिकेत प्रांजल मोरे, पायल बुधे, संस्कृती बुधे, प्रणव बुधे, अथर्व बुधे, आर्यन जाधव, मोहित शिंदे आणि प्रज्योत पवार हे कलाकार सहभागी झाले. विराज निकाळजे याने संगीत साथ दिली. त्यांना विभाग प्रमुख संदीप त्रिंबके यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संजय जगताप यांनी लेखन केलेल्या नाटिकेचे दिग्दर्शन विज्ञान शिक्षिका अर्चना माने यांनी केले. तर कला शिक्षक दिनेश सोनवलकर यांनी आकर्षक वेशभूषा केली. दरम्यान, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी हेमलता शिंदे, रामसिंग वळवी, संतोष देशमुख,विजयकुमार जाधव, एस.बी देशमुख, रवींद्र पारधी, विठ्ठल घाटगे, प्रवीण बरकडे, विशाल खिलारे, स्पर्धेतील यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे सचिव सुधाकर कुबे सर्व संचालक, मुख्याध्यापक संजय जगताप,अंबवडेच्या सरपंच शालन बुधे, उपसरपंच प्रमोद बर्गे, शाळा व्यवस्थापनचे विश्वजीत घाडगे, सर्व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.