पळसगाव सोसायटीत ब्रह्मचैतन्य पॅनलचा सर्व १३ जागांवर विजय

पळसगाव सोसायटीत ब्रह्मचैतन्य पॅनलचा सर्व १३ जागांवर विजय
मायणी —प्रतिनिधी
पळसगाव तालुका खटाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची अटीतटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ब्रह्मचैतन्य शेतकरी पॅनल, पळसगाव, विरुद्ध विकास पॅनल, पळसगाव यांच्यात चांगलीच रंगतदार लढत झाली. या रंगतदार झालेल्या निवडणुकीमध्ये ‘ब्रह्मचैतन्य शेतकरी पॅनलने विकास पॅनलचा तेरा शून्य असा पराभव केला.
पळसगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत ब्रह्मचैतन्य शेतकरी पॅनलने विकास पॅनलचा १३-० ने पराभव केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित करताच कार्यकर्त्यांनी ऐन पावसात गुलाल उधळून,फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
ब्रह्मचैतन्य पॅनलचे विजयी उमेदवार : सुरेश घाडगे, उमेश घाडगे, सुकुमार घाडगे, धनाजी फडतरे, प्रकाश फडतरे, भानुदास फडतरे, विजय फडतरे, सचिन फडतरे, जयश्री घाडगे, शुभांगी घाडगे, किसन हजारे, चंद्रकांत फाळके आणि हणमंत खरमाटे हे १३ उमेदवार ५० ते ५५ मतांच्या फरकांनी विजयी झाले.