
सहकारातील महामेरू प्रभाकरजी घार्गेजी साहेब
दिलदार व्यक्तिमत्वचा दानशूर राजा
संपादक..महेश तांबवेकर
माजी आमदार प्रभाकर घार्गे एक हसतमुख व दिलदार व्यक्तिमत्त्व. सहकारातील एक महर्षी प्रभाकरजी घार्गे यांनी राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला. अनेक संघर्षातून तावून-सुलाखून निघालेले हे नेतृत्व आज अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस. या निमित्ताने…
दि. १८ सप्टेंबर रोजी प्रभाकर घार्गेसाहेब. यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला असला तरी एक पारखी नजर, कुशाग्र बुद्धी असलेलेव्यक्तिमत्त्व म्हणजे साहेब सर्वसामान्यांपासून ते मोठ्या नेत्यापर्यंत बसणे, उठणे, दिलखुलास मनातील बोलणे, दिलदार वृत्ती व दानशूर स्वभावामुळे सर्वदूर ओळखले जावू लागले.
आमदार झाले तरी यात बदल झाला नव्हता. स्वभावामुळे ते सर्वसामान्यांचे आप्पा ते साहेब कधी झाले हे समजलेच नाही. शालेय जीवनात असताना त्यांचे मन त्यांना शांत बसून देत नव्हते. सतत गावाकडे औंधला यमाईदेवीच्या आशीर्वादाने साबण कारखाना काढला, कौतुक होऊ लागले; पण त्यात यश आले नाही. मात्र, या अपयशाने ही नवीन दिशा व स्फूर्ती मिळाली. सर्वसामान्य जनतेसाठी रोजगार निर्माण करायचा, हा विचार त्यांना झोपू देत नव्हता. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. दुष्काळाचे चटके त्यांनी सहन केले होते. हे भविष्यातील नव्या पिढीच्या वाटणीला येऊ नये. यासाठी काहीतरी करावे लागेल या भावनेने त्यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड दिली. कै. केशवराव पाटील यांचा समाजवादी विचाराचा वारसा आमदार झाल्यानंतर पुढे चालवू लागले. दुष्काळात तालुक्यातील जनतेसाठी मोफत धान्य, पाण्याच्या टाक्या व मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आमदारकीच्या काळात मांजरवाडी ते गिरीजाशंकरवाडी ते तरसवाडी गावोगाव विकासकामे केली. यामध्ये कोणताही राजकीय अशा स्वार्थ न ठेवता काम केले. तालुक्यात औद्योगिक क्रांती झाल्याशिवाय प्रगती औद्योगिक क्रांती झाल्याशिवाय प्रगती होणार नाही. औद्योगिकीकरणासाठी कण्हेर धरणातून २१ एमएलटी पाणी राखीव ठेवण्यात त्यांना यश आले. याच पाण्यावर तालुक्यातील काळी आई आता हिरवा साज घालत आहे. लहान-मोठे उद्योग येत आहेत. साहेब दुष्काळी तालुक्याचा डाग पुसण्यासाठी अहोरात्र झटत होते. खटाव तालुक्यात एमआयडीसी देखील मंजूर करून घेतली आहे. तालुक्यात आपला साखर कारखाना आहे. असावा, हे एक त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न त्यांना शांत झोपू देत नव्हते. स्वप्न त्यांना शांत झोपू देत नव्हते. मनोजदादा घोरपडे व संग्राम घोरपडे यांचा हातात हात घेऊन पडळ सारख्या माळरानावर साखर कारखान्याचे माळरानावर साखर कारखान्याचे लावलेले छोटे रोपटे विशाल वटवृक्ष होऊन डौलाने डुलत आहे. ध्येयवेड्या साहेबांच्या चेहऱ्यावर या स्वप्नपूर्तीचा आनंद पाहिल्यानंतर खा. शरद पवारसाहेबांनी कारखान्यावर कौतुकाचे गौरवोउदगार काढले होते.
साहेबांनी औद्योगिकीकरणाबरोबर तालुक्यातील शिक्षणालाही महत्त्व दिले. त्यांनी स्वतःच्या गावात ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुसज्ज असे विद्यालय उभे केले. हे विद्यालय अनेक वर्षे साहेब स्वखचनेि चालवत आहेत. इतकेच काय नव्हे तर केशवराव पाटील यांनी सुरू केलेले अनंत इंग्लिश स्कूल, सातारा पॉलिटेक्निक सातारा, फॉर्मसी कॉलेज, कटगुण येथील आश्रमशाळा साहेबांच्या विचाराने सुरू आहेत. साहेबांचा शेती क्षेत्रातील फार मोठा अभ्यास आहे. नेहमी शेती क्षेत्रात ते विविध प्रयोग करत असतात. त्यांच्या शेतीनिष्ठेमुळे रानातील सीताफळे विदेशात निर्यात झाली आहेत. हे सर्व करत असताना तालुक्याच्या चारही दिशांना त्यांची नजर होती. तालुक्याचे त्रिभाजन झाल्यामुळे तालुका एकसंध ठेवण्यात साहेबांना यश आले. बाजार समिती खरेदी-विक्री संघ, सहकारी संस्था या तालुकाच्या विचाराने एकत्र ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा त्यांच्या दूरदृष्टी स्वभावामुळे सहकारामधील अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अशा यशस्वी उद्योजक, सहकारातील महामेरू, दूरदृष्टी नेता, लोकमान्य नेतृत्व तालुक्याच्या सुखात व दुःखात सहभागी असणारे लाडके साहेब. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!