मायणीच्या यशवंत बाबांच्या पालखीचे दि. २१ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान .

मायणीच्या यशवंत बाबांच्या पालखीचे दि. २१ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान .
मायणी —प्रतिनिधी
श्री संत सद्गुरु यशवंत बाबा महाराज, मायणी ता. खटाव यांच्या आषाढी पालखी सोहळ्यास दिनांक 21 पासून प्रारंभ होत असून या पालखी सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री सद्गुरु यशवंत बाबा भजनी मंडळ मायणी व यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट मायणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या पालखी सोहळ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे- गुरुवार दि. 21 रोजी दुपारी 4 वाजता श्री सद्गुरु यशवंत बाबा समाधी मंदिराchn पालखीचे प्रस्थान होऊन पहिला मुक्काम मायणी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात असेल. त्यानंतर गुरुवार दि. 22 रोजी मायणी येथून पालखीचे प्रस्थान होणार असून कानकात्रे मार्गे विखळे मुक्काम. शुक्रवार दि. 23 तरसवाडी, विभूतवाडी मार्गे झरे मुक्काम. शनिवार दि. 24 शेनवडी मार्गे दिघंची मुक्काम. रविवार दि. 25 कटपळे, चिकमहूद मार्गे महूद बुद्रुक मुक्काम. सोमवार दि. 26 डोनमळा मुक्काम. मंगळवार दि. 27 संत नगर मुक्काम .बुधवार दि. 28 संत नगर पंढरपूर मुक्काम.
शुक्रवार दि. 30 रोजी परतीचा प्रवास सुरू होणार असून संध्याकाळी सुपली मुक्काम .शनिवार दि.1 रोजी धुळदेव ,राऊतवाडी ,म्हसवड मार्गे मायणीत आगमन.
दरम्यान मुक्कामाचे ठिकाणी ह.भ.प दादा महाराज मासाळ ,मायणी. बाल कीर्तनकार ह.भ.प प्रणव महाराज माळी मायणी, बाल कीर्तनकार ह.भ.प शुभम महाराज माने ,मायणी. ह.भ.प पांडुरंग महाराज माळी, मायणी .ह .भ .प विजय महाराज शिंदे, मायणी. ह.भ.प. बापू महाराज माळी, चिंचणी. ह.भ.प रोहित महाराज माळी ,देवीखिंडी यांची सुश्राव्य कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे. दि.27 रोजी सायंकाळी चार वाजता वाखरी संतनगर येथे
मायणीतील सर्व डॉक्टरांचे वैद्यकीय पथकामार्फत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.