शेतकऱ्यांचा अंत पाहू नका—- प्रताप जाधव
पुणे बेंगलोर महामार्गावर दुधाचे टँकर शिवसैनिकांनी अडवले.

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका—- प्रताप जाधव
पुणे बेंगलोर महामार्गावर दुधाचे टँकर शिवसैनिकांनी अडवले.
पुसेगाव -प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात बहुतांशी गावात प्रचंड दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे .खरीप गेलाच आता रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या हातातून जात आहेत.जनावरांना लागणारा चाराच शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची शक्यता नसतानाही कसेबसे प्रयत्न करत शेतकरी पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत एव्हढे करूनही शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असून व्यावसायिकांच्या भेसळयुक्त दुधाला दुप्पट भाव का ?जिल्ह्याचा अन्न व भेसळ विभाग झोपला आहे का?असा सवाल शिवसेना(उबाठा)उप जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केला आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्य परिस्थितीने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.खरीप हंगामासह रब्बीच्या आशा मावळल्या आहेत.जनावरांना चारा उपलब्ध नाही.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंब चालवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना २७,२८ रुपये प्रति लिटर दर आत्ता शासन देत आहे .याचा जमा खर्च काढला असता शेतकऱ्याच्या हातात काही शिल्लक राहत नाही .मात्र पॅकिंगचे दूध ६०रुपये लिटर अन शेतकऱ्याकडून डेअरीत किंवा गावोगावी फिरून गोळा केलेले जाणारे दूध २७ रुपये लिटर हा कोणता न्याय?
दूध संस्था व खाजगी दूध संस्था यात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत आहे असा आमचा आरोप आहे . *जिल्ह्यात अन्न व भेसळ विभाग झोपला आहे का? शासनाने शेतकऱ्यांकडून योग्य दराने दूध खरेदी करावे ,अन्यथा दुग्धउत्पादक व शेतकऱ्यांच्या उद्रेकास येणाऱ्या काळात सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रताप जाधव यांनी दिला आहे.*
*यावेळी सातारा जिल्हा उपप्रमुख दत्ता नलावडे, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, शहर प्रमुख गणेश अहिवळे, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे,महिपती डंगारे,मुगुटराव कदम,सचिन जगताप व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.*
निष्क्रिय सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा व शेतकऱ्याला न्याय द्यावा येत्या अधिवेशनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे एकमेकाची जिरवण्यात व्यस्त असलेले लोकप्रतिनिधी शेतकरी विषयी जागृत नाहीत असे दिसत आहे आज आज टँकर अडवले आहेत, उद्या दूध डेऱ्यामध्ये घुसू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
सातारा शहर पोलीस स्टेशन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.