भारत फोर्ज वतीने खातगुण येथे बंदिस्त गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण

भारत फोर्ज वतीने खातगुण येथे बंदिस्त गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
पुसेगाव–प्रतिनिधी
खातगुण तालुका खटाव येथील भारत फोर्ज लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून खाद्गुण गाव हे विकासासाठी घेतले असून,आज पहिल्या टप्प्यातील गावातील बंदिस्त गटर व रस्त्याचे काम पूर्ण केली त्याचा लोकार्पण सोहळा आज खातगुण येथे साजरा करण्यात आला.
भारत फोर्ज लिमिटेड पुणे या कंपन्यांच्या माध्यमातून अर्थ व तंत्र साह्याने श्री एस आर फंडातून खातगुण गावची निवड केली व बंदिस्त गटार योजनेच्या अडीच हजार मीटर कामाच्या पहिला टप्पा पूर्ण केल्याबद्दल आज या ठिकाणी त्याचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच अमीना सय्यद उपसरपंच शिवाजी लावंड, सोसायटीचे चेअरमन विजय लावंड, सोसायटीचे व्हाईस चेअरमन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय गुजर, ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी लावंड, मनीषा माने, काजल जाधव, यशवंत लावंड, आनंदराव लावंड, संजय पवार,सदाशिव लावंड,नीलम पवार,जयश्री यादव, सोसायटीचे सर्व सदस्य, तंटामुक्तीचे सर्व सदस्य, राम रहीम संघटनेचे सर्व पदाधिकारी, श्री भैरवनाथ जोगेश्वरी संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.