मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने आशा स्वयंसेवीकांना रु. एक लाखाच्या आरोग्य किटचे वाटप

मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने आशा स्वयंसेवीकांना रु. एक लाखाच्या आरोग्य किटचे वाटप
मायणी —– प्रतिनिधी
मायणी ता. खटाव ग्रामपंचायतच्या वतीने येथील आशा स्वयंसेविकांना सुमारे एक लाख रुपये किमतीच्या आरोग्य विषयक किटचे वाटप करण्यात आले.
सदर किटचे वाटप मायणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच सौ.सोनाली माने, उपसरपंच दादासाहेब कचरे व ग्रा.पं. सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मायणी प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका माळी, ग्रा.पं. सदस्य युवराज भिसे , कांता पाटोळे ,रोहिणी झोडगे, ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी हेमंत जाधव,विनोद पवार, महादेव माळी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना उपसरपंच दादासाहेब कचरे म्हणाले, आशा स्वयंसेविकांना घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करताना शुगर टेस्ट, ब्लड टेस्ट, ब्लड प्रेशर टेस्ट, ताप,वजन घेणे आदी बाबींची गरज असते .मात्र यासाठी यासाठी गरजू रुग्णांना प्रा.आ. केंद्रामध्येच जावे लागते .यासाठी आशा स्वयंसेविकांनी सदर कि ट आम्हास उपलब्ध झाल्यास रुग्णांची योग्य पद्धतीने व तातडीने तपासणी करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने सदर आरोग्य किट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती .गावातील नागरिकांची काळजी घेणे ही महत्त्वाचे बाब असल्याने ग्राम पंचायतीचा स्वयं निधी व दहा टक्के महिला कल्याण निधीतून एकूण 12 आशा स्वयंसेविकांना वजन काटा, डिजिटल थर्मामीटर, शुगर टेस्ट किट, बीपी टेस्ट किटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यांना रजिस्टरची गरज असते ती देखील लवकरच पूर्ण करण्याचे येईल. अशा प्रकारचा उपक्रम खटाव तालुक्यात मायणी ग्रामपंचायतीने सर्वात प्रथम राबविल्याने आपणास निश्चित समाधान आहे. यापुढेही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने निश्चितपणे प्रयत्न केले जातील. यावेळी अंगणवाडी सेविकांनी हे किट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले.