प्रार्थना सूर्यवंशीचे एन.एस.एस.ई परीक्षेत यश

प्रार्थना सूर्यवंशीचे एन.एस.एस.ई परीक्षेत यश
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
पुसेगाव येथील भवानीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी प्रार्थना सूर्यवंशी या विद्यार्थिनीने भवानीनगर शाळेतून एन.एन.एस.ई या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केले. राज्यस्तरीय एन.एस.एस.ई या परीक्षेमध्ये भवानी नगर जिल्हा परिषदशाळेमधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला. यामध्ये प्रार्थना सूर्यवंशी हिने १८२ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला
स्वरा सावंत प्रज्ञेश अबदांगिरे, आर्यन पवार, समर्थ चव्हाण, वेदिका जाधव, अनन्या पिसे, शिवम जगदाळे, रोहित जाधव, वैष्णवी कदम, साईश डांगे, जयेश हिंगमिरे, ध्रुव माने या विद्यार्थ्यांनी एन.एस.एस.ई या परीक्षेमध्ये यश संपादन केले
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक घाडगे मॅडम, सुभाष नाळे, सोमनाथ पाटोळे, आशा भोसले, प्रतिमा सावंत, बागेकरी मॅडम आणि सूर्यवंशी मॅडम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला तर परीक्षेमध्ये सहभागी झालेल्यांना सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
भवानीनगर जिल्हा परिषद शाळेने विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आजवर उत्तुंग यश संपादन करून आपल्या यशाची दखल पुसेगावकरांना दाखवून दिले आहे. त्यामुळे भवानीनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुसेगाव व परिसरातील भवानीनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुसेगाव व परिसरातील पालकांचा ओढा वाढलेला दिसत आहे.