श्री. सद्गुरू यशवंतबाबा महाराजांच्या यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन
पाच एप्रिल रोजी रथोत्सव

श्री. सद्गुरू यशवंतबाबा महाराजांच्या यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन
पाच एप्रिलला रथोत्सव
मायणी -प्रतिनिधी
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मायणी ता. खटाव गावचे दैवत श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने दि. ३० मार्च ते दि.८ एप्रिल अखेर यात्रोत्सव व जनावरांच्या जंगी यात्रेचे आयोजन आले आहे.
त्या निमित्ताने सदर यात्रेच्या नियोजनाची मीटिंग श्री सद्रुरु यशवंत बाबा मंदिरात संपन्न झाली. या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी बंडा उर्फ गोरक्षनाथ माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी जि.प.सदस्य व ट्रस्टचे खजिनदार सुरेंद्र गुद गे यांचे अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली सदर वेळी यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काकासाहेब माने,उपाध्यक्ष आबासाहेब माने, सचिव द.ग. माने गुरुजी, विश्वस्त रणजीत माने, उपसरपंच दाद- साहेब कचरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे मार्केट कमिटीचे संचालक स्वप्निल घाडगे, यशवंत विकास सोसायटीचे चेअरमन अनिल माळी, विजय माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सुरेश कोळी महेश जाधव अरुण भिसे, नागेश यादव, विजय शिंदे, मन्सूर भाई नदाफ, अभिजीत कचरे, दिनकर झोडगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रा व पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने पुढील प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले शनिवार दि.३० रोजी श्री सदुरु यशवंत बाबा महाराज पुण्यतिथी. रविवार दि. ३१ पालखी व भंडारा. शुक्रवार दि. ५ मुख्य रथ सोहळा. दि.२८ मार्च ते ४ एप्रिल अखेर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
यात्रेच्या नियोजनसाठी यानिमित्ताने यात्रा कमिटी स्थापन करण्यात आली.
या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी बंडा उर्फ गोर- क्षनाथ माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामध्ये चेअरमन गोरखनाथ माने उर्फ बंडा महाराज, व्हाईस चेअरमन दत्तात्रय शिंदे, श्रीमंत घाडगे, सचिव राजू बाबर, सहाय्यक सचिव सागर पाटोळे, खजिनदार – शंकर नायकुडे, सहाय्यक खजिनदार – बाळासाहेब यलमर
या निमित्ताने भंडारा रथ सजावट मंदिर सजावट व दक्षता टिंब यांची स्थापना करण्यात आली दरम्यान धुळवडी दिवशी व्यापारांसाठी जागा वाटप करण्यात येणार आहे. यात्रे संदर्भात मार्गदर्शन करताना सुरेंद्र गुदगे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. आचार संहितेच्या सर्व नियमांचे ग्रामपंचायतीने काटेकोरपणे पालन करावे. मायणीची जनावरांची यात्रा ही प्रसिद्ध आहे.जनावरांच्या यात्रेत लाखो रुपयांचे व्यवहार होत असतात. मात्र तथापि गेले काही वर्षे जना वरे न आल्याने ती बंद पडली आहे मात्र यात्रा कमिटीने बैल व गाय या प्रकारात पन्नास हजारांची बक्षीस योजना जाहीर करून पुन्हा बैलांची यात्रा भरावी यासाठी प्रोत्साहन द्यावे.