कामे करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभे रहा : सुरेंद्र गुदगे
माळी वस्ती -कलेढोण येथे सभामंडप भूमीपूजन

कामे करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभे रहा : सुरेंद्र गुदगे
माळी वस्ती -कलेढोण येथे सभामंडप भूमीपूजन
मायणी। — प्रतिनिधीम
हाराष्ट्रात अनेकदा राजकीय घडामोडी घडत असतात अनेक वेळा सरकार बदलले तरीही मी तुम्हाला निधी कमी पडू दिला नाही सरकार कोणतेही असो विकास कामात गय होणार नाही तुम्हाला येणारा निधी कमी पडणार नाही कामाच्या बाबतीत ज्या पद्धतीने विकास केला त्याच पद्धतीने विकासाची गंगा या पुढील काळात वाहती ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन.माळी वस्ती -कलेढोण येथील ग्रामस्थांनी श्री रेणुका मंदिरासमोर सभामंडप बांधून देण्याची मागणी माझ्याकडे केली होती. त्यांनी केलेल्या मागणीनुसार सभामंडपाचे भूमीपूजन करताना आनंद होत असून विकास कामे करणाऱ्याच्या पाठीशी ग्रामस्थांनी ठाम उभे राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले. ते सभामंडपाच्या भूमीपूजनावेळी बोलत होते. यावेळी मार्केट कमिटी संचालक स्वप्निल घाडगे, शैलेंद्र वाघमारे,सरपंच प्रतिनिधी सुहास शेटे, उपसरपंच अरुण बुधावले,ग्रामपंचायत सदस्य उस्मान तांबोळी, प्रकाश लिगाडे,मायणी अर्बन बँकेचे संचालक अन्सार इनामदार, सयाजी पाटील, मारूती दबडे, सचिन शेटे, खुद्बुद्दिन शेख, बबन तरसे, पुजारी सुरेश माळी,धनाजी तोडकर,अमोल सुतार,अशोक माळी,परशुराम तोडकर, महादेव सुतार,सतीश माळी,आकाश माळी,जालिंदर तोडकर आदी उपस्थित होते.
कामातून समाजाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करायचे असल्याचे सांगून गुदगे म्हणाले, गावागावात निवडणूका आल्यानंतर विकासकामाचे नारळ फुटतात. मात्र ती कामे पुर्ण होतील यांची शाश्वती नसते. त्यामुळे लोकांचा नारळावरचा विश्वास कमी होत चालला आहे. त्यामुळे आपण एखादे काम मंजूर करुन घेवून त्यासाठी निधी उपलब्ध करुन घेतो.त्या कामाचा रितसर आदेश ग्रामस्थांना पोस्टाने पाठवून देवून कामाबद्दल माहिती देतो. त्यानंतरच कामाचा नारळ फोडतो. ही कामाची पद्धत आपण अवलंबल्यामुळे लोकांचा नारळावरचा विश्वास पुन्हा बसला आहे. माळी वस्ती येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे श्री रेणुका मंदिरासमोरील सभामंडपासाठी निधीची मागणी केली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेतून सात लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. समाजात विकासकामे करताना मागेल तिथे काम करण्याची धमक आपल्यात असून त्यासाठी वाटेल तितका निधी उपलब्ध करुन घेण्यात आपण कधीच कमी पडत नाही. यावेळी रघुनाथ तोडकर म्हणाले, सुरेंद्र गुदगेंनी कलेढोण मध्ये कोट्यावधीची विकासकामे उभा केली आहेत. त्यामुळे विकासाभिमुख नेतृत्वाच्या पाठीशी आपण ठामपणे उभा आहे. आगामी काळात त्यांना राजकीय ताकद देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मारूती दबडे, हणमंत पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन नवनाथ माळी यांनी केले.आभार हणमंत तोडकर यांनी मानले