आपला जिल्हाकृषी व व्यापार

कराड येथे भव्य  कृषी प्रदर्शन  

    कराड येथे भव्य  कृषी प्रदर्शन

कराड -प्रतिनिधी

Download Aadvaith Global APP
  • कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे 28 नोव्हेंबरपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.  कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचविणे.  शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन- विस्तार शेतकरी विपणन साखळी समक्षीकरण.  समुह / गट संघटीत करुन स्थापि.त शेतकरी उत्पादक कंपन्याची क्षमता बांधणी करणे.  शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा या करिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे. हा या मागाचा प्रमुख उद्देश आहे.

    त्यासाठी कृषि विषयक परिसंवाद व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाण घेवाणीद्वारे शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे.  विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातुन बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे व शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करणे या उद्देशाने घेण्यात येत असलेला  जिल्हा कृषि महोत्सव  प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

    जिल्हा कृषि महोत्सवाचे स्वरुप : कृषि प्रदर्शने – कृषि महोत्सवातील कृषि प्रदर्शने हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्याची दालने, प्रात्यक्षिके, खादय पदार्थाचे स्ट्रॉल इ. समावेश आहे. कृषि व कृषि पूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन करणेसाठी कृषि व कृषि संलग्न विभागाचा सक्रीय सहभाग राहणार आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच खाजगी कंपन्या, उदयोजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या याचाही सहभाग आहे.

    उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था : जिल्हयातील शेतक-यांनी उत्पादित केलेल्या/ प्रक्रिया केलेल्या दर्जेदार मालाची विक्री श्रृंखला विकसीत करणेस प्रोत्साहित करावाच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसाठी स्वंतत्र दालन उभारण्यात आलेले आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, इंद्रायणी तांदूळ, गहू, राळा, नाचणी, वरी, सर्व प्रकारचे कडधान्य तुर, मुग, मसूर, हरभरा, घेवडा, डाळी, शेंगदाणा, भाजीपाला, विदेशी भाजीपाला, आले, फळे पेरू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, प्रक्रिया युक्त पदार्थ – मसाले, हळद पावडर, विविध प्रकारचे लोणचे, सेंद्रिय गुळ, गुळ पावडर, काकवी, मध, आले पाक, आले सरबत, विविध फळांचे जाम, शतावरी पावडर, शतावरी कल्प, नाचणीचे पदार्थ- पापड, सत्व, लाडु, शेवया, राजगिरा लाडू, सोया स्टिक, हर्बल उत्पादने, रेडी टू इट पदार्थ- इडली, विविध प्रकारचे तेल- शेंगदाणा तेल, सुर्यफुल, करडई, लाकडी घाण्यावरचे शेंगतेल इ. शेतमालाचा समावेश आहे.

    विक्रेता खरेदीदार संम्मेलन : दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी विक्रेता खरेदीदार सम्मेलन आयोजित केले आहे. यामध्ये प्रक्रियादार, निर्यातदार, घाऊक विक्रेते, ऑनलाईन मार्केटिंग कंपनीचे प्रतिनिधी यांसारखे खरेदीदार व शेतमाल उत्पादित करणारे, प्रक्रिया करणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे लाभार्थी यांचा विक्रेते म्हणून सहभाग असणार आहे. यामध्ये विक्रेता व खरेदीदार यांचेमध्ये सामंजस्य करार होणार आहेत.

    शेतकरी सन्मान समारंभ : जिल्हयातील कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात येणार आहे.

    तरी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

     

मुख्य संपादक

सामाजिक सांकृतिक राजकिय कृषी व खेळ जगत बातम्यांचे व्यासपीठ भागातील बातम्या पाहण्यासाठी youtube channel==lokpravah news संपादक -- महेश तांबवेकर = 7709797534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button