आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन
स्केटिंग स्पर्धेत क्षितीज लोहार राज्यात पांचवा.

स्केटिंग स्पर्धेत क्षितीज लोहार राज्यात पांचवा.
मायणी प्रतिनिधी
विरार मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये सात ते दहा वयोगटात कलेढोण तालुका खटाव येथील सात वर्षीय क्षितिज अवधूत लोहार याने राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त करून उज्वल यश संपादन केले आहे भारती विद्यापीठ, विटा ता. खानापूर या शिक्षण संस्थेत तो इ.२ रीमध्ये तो शिक्षण घेत आहे.
यापूर्वी झालेल्या स्केटिंगच्या अनेक स्पर्धामध्ये त्याने जिल्ह्यात प्रथम कमांक प्राप्त केला आहे
प्रसिद्ध प्रवचनकार व सकल लोहार समाज विकास मंच ,साताराचे क्रियाशील सदस्य ह.भ.प. पांडुरंग लोहार यांचा तो नातू आहे.कलेढोण शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. सयाजी पवार , संघटनेचे अध्यक्ष हणमंत चव्हाण, सकल लोहार समाज बांधव मायणी व कलेढोण यांनी अभिनंदन केले.