आपला जिल्हा

आज मायणी येथे संत सदगुरु सुरूताई माऊलींचा रथोत्सव

आज मायणी येथे संत सदगुरु सुरूताई माऊलींचा रथोत्सव

मायणी  –
गुरुकृपा होई ज्याशी दैन्य दिसे कैसे त्यासी समस्त देव त्याचे वंशी कळी काळाशी जिंके नर ॥ या वचनाप्रमाणे मातोश्री सरुताईंना गुरूप्रमाणे मानून कार्यरत राहणाऱ्या भक्तगणास कधीही कशाची अडचण जाणवत नाही . सरुताईंना जाऊन दहा वर्ष झाले . पण आजही त्या चराचरात आहेत . भक्ताने हाक मारताच त्या त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी धावून जातात . सर्व भक्तांच्या पाठिशी त्या ठाम आहेत . त्यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना हजारो भक्तांचे विनम्र अभिवादन .

Download Aadvaith Global APP

ऐसा पुत्र देगा देवा । लोका वाटेल त्यांचा हेवा ॥ देशील तरी कन्या देई । जशी मीरा मुक्ताबाई || खरोखरच तावरे घराण्याचा व मायणी गावातील समस्त भक्तगणांचा उध्दार करण्यासाठीच सरुताईच्या रुपाने संत मीराबाई व मुक्ताबाई पुर्नजन्म घेतल्याचे भाविक मानतात . मायणी येथील कापड व्यापारी रघुनाथ मारुती कवडे यांच्याबरोबर १९३४ ते १९३५ च्या दरम्यान सरुताईंचा विवाह झाला . एक आदर्श पत्नी , पतीव्रता म्हणून त्यांचा परिचय होता . ताईंनी पतीजवळ कधीही कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला नाही . लग्नानंतर त्यांच्या रूपाने लक्ष्मी आल्याने अल्पावधीतच कवडे घराण्याची भरभराट झाली , लग्नानंतर ताईंनी लक्ष्मण , कृष्णाबाई सुशिला या तीन अपत्यांना जन्म दिला त्यानंतर काहि दिवसाने त्यांना भूतबाधा झाल्याची अफवा उठली . या कालावधीत त्यांच्या बुध्दीमतेवर परिणाम झाला वाट्टेल ते बडबडणे , वेळी अवेळी घराबाहेर पडणे असे प्रकार घडू लागले या विकाराबद्दल घरच्या लोकांनी वैद्यकीय उपचाराबरोबरच तंत्र मंत्राचाही वापर केला परंतु त्याचा उपयोग झाला नाही . त्यानंतर पतींनी दुसरे लग्न केले पतीच्या दुसऱ्या – विवाहानंतर सरुताईंनी घरादाराचा त्याग केला व त्या धनगरवाडीच्या वेताळ माळावर राहू लागल्या . ताईंच्या विचित्र वागण्यामुळे परिसरातील लोक त्यांना वेडी सरी म्हणत असत . अशाच अवस्थेत काही कालावधी गेल्यानंतर बारा वर्षाच्या अथक तपश्चर्येनंतर त्या गावात फिरु लागल्या . गावात फिरत असताना त्या ज्या ज्या ठिकाणी जातील त्या भक्तांचे कल्याण होत गेले .

काही काळाने त्यांच्या वडिलांच्याकडे यशवंतबाबांची गादी आली . हळूहळू सरुताईंच्या प्रसादाची महती दिवसेंदिवस वाढत जावू लागली . बुधगांव ( ता . मिरज ) येथील संत गुंडोबुवा महाराज यांच्या उत्सवास त्या अकरा वर्षे नियमित जातात . हा उत्सव गुढीपाडव्यापासून एक दिवस चालतो . तेथील भाविकांना सरुताईमध्ये गुंडोंबाबाचीच रूप आढळून येते . ॥ ऐसा ज्याचा अनुभव ॥ || विश्वदेव सत्वे || ॥ देव तया जवळी असे ॥ ॥ पाप नसे दर्शने ॥ या तुकोबारायांच्या अभंगवाणीप्रमाणे सरुताईंचा सहवास ज्या भक्तांना लाभला त्या भक्तांचे कल्याण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत .

त्यांच्या भक्तीचे फळ मिळालेल्यांमध्ये वडूजचे शिवराम माळी , माहुलीच्या शांताबाई नाथा फळके , रेवणगाव येथील सुभाष पांडुरंग मुळीक , शिरुळचे बाबुराव कृष्णा पुजारी , दत्तनगर शिरुळचे श्रीपतराव पाटील , इंदुताई रत्नपारखी पुसेसावळी , तासगांवचे बंडूलाल मुजावर , कातरखटाव येथील कमल काटकर , आगळगांवचे मधुकर कोडक , मायणीचे वसंतराव तावरे , फलटणच्या कृष्णाबाई ननावरे , कातरखटाव येथील शारदा चोथे व शुभांगी लोखंडे , रोहित जाधव वडूज , भास्कर फाळके , रविंद्र माने , भगवान जाधव माहुली , सुधीर देशपांडे , कमल तारळेकर यांच्यासह शेकडो भक्तांचा समावेश आहे . गुरुकृपा होई ज्याशी । दैन्य दिसे कैसे त्यासी ॥ समस्त देव त्याचे वंशी कळी काळाशी जिंके नर || या वचनाप्रमाणे मातोश्री सरुताईंना गुरप्रमाणे मानून कार्यरत राहणाऱ्या भक्तगणास कधीही कशाची अडचण जाणवत नाही . सरुताईंना जाऊन दहा वर्ष झाले . पण आजही चराचरात आहेत सर्व भक्तांच्या पाठिशी त्या ठाम आहेत . त्यांच्या अकराव्या  पुण्यस्मरणानिमित्त त्यांना हजारो भक्तांचे विनम्र अभिवादन…

संकलन – तानाजी चव्हाण

मुख्य संपादक

सामाजिक सांकृतिक राजकिय कृषी व खेळ जगत बातम्यांचे व्यासपीठ भागातील बातम्या पाहण्यासाठी youtube channel==lokpravah news संपादक -- महेश तांबवेकर = 7709797534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button