ग्रामपंचायत पुसेसावळी मार्फत स्वच्छता अभियान
स्वच्छता हीच ईश्वर सेवा । स्वच्छता म्हणजेआरोग्य

ग्रामपंचायत पुसेसावळी मार्फत स्वच्छता अभियान
स्वच्छता हीच ईश्वर सेवा । स्वच्छता म्हणजे आरोग्य
पुसेसावळी प्रतिनिधी–समद आत्तार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभर १ तारीख १ तास स्वच्छता अभियान राबवला जातोय. त्याचप्रमाणे पुसेसावळी ता. खटाव जि. सातारा येथे स्वच्छता म्हणजे आरोग्य याला महत्व दिले आहे.
पुसेसावळीत आज १ तारीख १ तास सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामपंचायत पुसेसावळी ते गावातील प्रमुख रस्त्यापासून गल्लीबोळापर्यंत प्रत्येक जण कचरा प्लास्टिक झाडू खराट्याच्या साह्याने गोळा करून पाटीत भरून कचरा गाडीत टाकत होते. या अभियानात मा.सरपंच सुरेश बापू पाटील,सरपंच सौ सुरेखा माळवे,मा.सरपंच दत्तात्रय रुद्रके उपसरपंच शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत कर्मचारी आशासेविका स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.तसेच नागरिकांनीही या अभियानाला उत्तम प्रतिसाद दिला. हा अभियान राबवून स्वछता हीच सेवा ह्याची जाणीव करून देऊन अभियान पार पडले.