शैक्षणिक साहित्य वाटप करून महेश जाधव यांचा वाढदिवस साजरा

शैक्षणिक साहित्य वाटप करून महेश जाधव यांचा वाढदिवस साजरा
मायणी –प्रतिनिधी
मायणी पत्रकार संघाचे व फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ सयाजी जाधव यांचा वाढदिवस भारतमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेज,वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करून अत्यंत उत्साहाचे वातावरणात संपन्न झाला.
पत्रकार महेश जाधव यांचा वाढदिवसानिमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे,मार्केट कमिटीचे संचालक स्वप्निल घाडगे,यशवंत विकास सोसायटीचे चेअरमन अनिल माळी,सरपंच प्रतिनिधी रणजीत माने, उपसरपंच दादासाहेब कचरे,युवा नेते ऋत्विक गुदगे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत जाधव,महादेव माळी,विनोद पवार, खटाव तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कोळी, उपाध्यक्ष दिपाली भोसले, लेखक व कवी बाळासाहेब कांबळे,मंगलमूर्ती मेडिकलचे व्यवस्थापक महामुनी बंधू व सर्व पत्रकार बांधव यांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी दूरध्वनी द्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.तसेच कुटुंबियातील सर्व सदस्यांनी सकाळीच त्यांना औक्षण करुन शुभेच्छा दिल्या.