वडूज येथील शिवदत्त व आदिशक्ती मंडळाचा दुर्गा उत्सव उत्साह होतोय साजरा

वडूज येथील शिवदत्त व आदिशक्ती मंडळाचा दुर्गा उत्सव उत्साह होतोय साजरा
वडूज -प्रतिनिधी
वडूज येथील शिवदत्त व आदिशक्ती मंडळाचा दुर्गा उत्सव उत्साहात. वडूज बाजार पेठेतील सर्व महिला व भाविक भक्त यांच्या श्रध्देचा विषय असलेल्या शिवदत्त व आदिशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचा सन 2023 चा श्री दुर्गा उत्सव अतिशय उत्साहात संपन्न होत आहे.दोन्ही मंडळाच्या सात्विक आकर्षक मूर्ती भाविक भक्तांच्या श्रध्देचा विषय बनल्या आहेत.शिवदत्त दुर्गा उत्सव मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी महारुद्र पशुपती श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचनाचा कार्यक्रम गुरूवार दि.19 रोजी संध्या.6.30 वा.श्री विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी श्री कोळेकर महाराज म्हणाले की,दुर्गा उत्सवातून सर्वांनी स्त्री शक्तीचा जागर करून तिला सभेत संचार करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.देव ,अध्यात्म,सारासार विचारसरणी आणि विवेकवाद यांचा सर्वांनी या निमित्ताने स्विकार केला पाहिजे.
दोन्ही मंडळातर्फे रोज सकाळ संध्याकाळ विविध भक्तांच्या हस्ते महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात येतो.श्री दुर्गा मातेस रोज नवीन वस्त्र प्रावरणे व आभूषणे दान करून ,परिधान केली जातात.त्याच बरोबर श्री देवी स्तोत्र व इतर स्तोत्र व मंत्र यांचे पठण करून ,यज्ञयाग केला जातो.विद्यार्थी वर्गासाठी निबंध,वक्तृत्व,चित्रकला,रांगोळी स्पर्धा तसेच संगीत खुर्ची असे खेळ आयोजित केले जातात.रोज रास दांडिया, गरबा नृत्याचे संगीतमय आयोजन केले जाऊन भक्तीचा जागर केला जातो.महिला वर्ग व तरुण तरुणी यांचेसाठी होम मिनिस्टर ,रेकॉर्ड डान्स,बौद्धिक खेळ,ढोल ताशा पथक,बासरी,पेटी,तबला वादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
दोन्ही मंडळाचे सर्व तरुण स्त्री पुरुष कार्यकर्ते , मुले मुली श्री दुर्गा उत्सव यशस्वी करण्यासाठी तन मन धन रूपाने समर्पण देत आहेत.