दुर्गोत्सवानिमित्त मायणीच्या जगदंब मंडळाचे दि. १५ ते २६अखेर विविध कार्यक्रम .

दुर्गोत्सवानिमित्त मायणीच्या जगदंब मंडळाचे दि. १५ ते २६अखेर विविध कार्यक्रम .
मायणी दि. १६ प्रतिनिधी
मायणी ता.खटाव येथील जगदंब सांस्कृतिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने दि. १५ते २६ ऑक्टोबर अखेर विविध धार्मिक,सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सुरमुख व कार्याध्यक्ष हेमंत जाधव यांनी दिली.
यानिमित्ताने पुढील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे-मंगळवार दि. १७रोजी देवीचा गोंधळ व भव्य दांडिया. बुधवार दि. १८ रोजी रात्री ८ते १० होम मिनिस्टर
.गुरुवार दि. १९ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मायणी यांचेवतीने आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा, कुंकुमार्चन विधी व रात्री ९ ते १२ भैरवनाथ नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ यांचा भारुडाचा कार्यक्रम .शुक्रवार दि. २०रोजी दुपारी ३ ते५ ओंकार कल्चरल ग्रुप ,विटा यांचा मंगळागौर व हळदीकुंकू समारंभ. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे हस्ते होणार आहे. शनिवार दि. २१रोजी सायंकाळी ६ ते ११ हिंदी मराठी गीतांचा नृत्यविष्कार महाराष्ट्राची लोकधारा. रविवार दि. २२ रोजी रांगोळी स्पर्धा. सोमवार दि. २३ रोजी पाक कला स्पर्धा, मंगळवार दि. २४ रोजी रात्री प्वाजता महाआरती व भव्य दांडिया. बुधवार दि. २५रोजी श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद तसेच मायणी भजनी मंडळाचा कार्यक्रम .गुरुवार दि. २६रोजी रात्री ९ वाजता श्री दुर्गामाता देवीचे विसर्जन