आज पडळ साखर कारखान्याचा पाचवा गळीत हंगामाचा शुभारंभ

आज पडळ साखर कारखान्याचा पाचवा गळीत हंगामाचा शुभारंभ
मायणी-प्रतिनिधी
खटाव माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग प्राव्हयेट लिमिडेट, पडळ या साखर कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मंगळवार ता.२४ रोजी विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर सकाळी १० वाजता कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे, को-चेअरमन मनोज घोरपडे व कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांचे प्रमुख उपस्थित पार पडणार असल्याची माहिती
कारखान्याचे जनरल मॅनेजर अशोक नलवडे यांनी दिली. खटाव माण तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊसास कायम चांगला दर देवून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या कारखान्याचे नवनवीन प्रकल्प होत आहेत.त्यामुळे कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.
कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व हितचिंतक शेतकरी श्री व सौ.महेश जाधव, बाळासाहेब जगताप, रणजीत पाटील,विनायक घोरपडे,विनोद देशमुख,दादासो चव्हाण,संभाजीराव ढगे, विकास गायकवाड,रणजीत माने,अमर देशमुख, किसन सानप व धंनजय मोरे यांच्याहस्ते हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी संचालक विक्रम घोरपडे,प्रीती घार्गे,कृष्णत शेडगे,महेश घार्गे,धनाजी जाधव, आण्णासो जाधव,अमोल पवार,जयवंत जाधव तसेच युवराज साळुंखे,महेश चव्हाण, टेक्निकल डायरेक्टर नरेंद्र साळुंखे व प्लांट हेट काकासो महाडिक उपस्थित राहणार आहेत. तरी या गळीत हंगामाच्या शुभारंभास सभासद शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नलवडे यांनी केले आहे.