पडळच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा
कृषी विभाग व हनुमान पंचक्रोशीचा उपक्रम

पडळच्या विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा
कृषी विभाग व हनुमान पंचक्रोशीचा उपक्रम
मायणी-प्रतिनिधी
बाई मी धरण धरण बांधिते , माझ मरण मरण कांडिते या दया पवार यांच्या कवितेला टाळ्यांचा प्रतिसाद देत पडळ (ता.खटाव) येथील हनुमान पंचक्रोशी विद्यामंदिरतील विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य ओढ्यावर बंधारा बांधला.ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना पोत्यापासून बंधारे बांधण्याचे ज्ञान विद्यार्थांना दिले.यावेळी मायणीचे कृषी अधिकारी एम.एन.जाधव,कृषी सहायक तानाजी चव्हाण,मुख्याध्यापिका शैलजा माळी,संजयकुमार शिंदे,सतिश रोकडे,हणमंत माने,अंकुश चव्हाण आदी.उपस्थित होते.
यावेळी तानाजी चव्हाण म्हणाले, पडळ गावातील शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व आहे. मात्र ते पाणी अडवून मातीत जिरवणे हेही महत्वाचे आहे.त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून बांधला आहे.त्यासाठी मोकळ्या पोत्यात ओढ्यालगतचीच माती भरुन ती ओढ्यात अंथरली.त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत भर पडणार आहे. हा बंधारा आपण गावाजवळच मॉडेल म्हणून बांधल्याने शेतकऱ्यांना तो पाहता येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे यांच्या संकल्पनेतून,तालुका कृषी अधिकारी राहूल जितकर यांच्या मार्गदर्शनातून आज बंधारा उभा राहिला आहे. यावेळी अंकुश चव्हाण म्हणाले, मुरमाचा थर म्हणजे पाण्याचे घर असून शालेय वयातच पाणी बचतीची सवय विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावी.कृषी खात्याच्या सहकार्यातून रिकाम्या पोत्यात माती भरुन बंधाऱ्याची उंची,लांबी,रुंदी याचे प्रमाण समजले. केवळ १५० रुपयात,विद्यार्थ्यांच्या तीन तासाच्या परिश्रमातून आणि छोट्या-मोठ्या ३०-३५ पोत्यांत माती भरुन गावजवळच्या ओढ्यात मातीचा उत्कृष्ठ बंधारा बांधता येतो. हे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले. यावेळी कृषी विभागामार्फत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यकुशल विद्यार्थी..!
कृषी विभागाचे तानाजी चव्हाण यांनी सकाळी बंधारा उभारण्याबाबत मुख्याध्यापिका शैलजा माळी यांना विचारणा केली.त्यानंतर माळी यांनी शिक्षकांना याबद्दल सांगून विद्यार्थ्यांनी घरातून खोरी,टिकाव व पाट्या आणून केवळ तीन तासात हा बंधारा उभा केला.त्यामुळे पडळ शाळेचे कार्यकुशल असल्याचे सांगत कृषी विभागाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.