पुसेसावळी येथे दुकानाला भीषण आग, आगीमुळे लाखोंचे नुकसान….

पुसेसावळी येथे दुकानाला भीषण आग, आगीमुळे लाखोंचे नुकसान….
प्रतिनिधी :- समद आत्तार
पुसेसावळी येथील अल्फीया बँगल स्टोर या दुकानाला सकाळी दहा च्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे दुकानामधील वस्तु अगीच्या बक्षस्थानी पडून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे .
सकाळी १० च्या सुमारास दुकानाला लागलेली आग शेजारील व्यापाऱ्यांनच्या निदर्शनास येताच त्यांनी दुकान मालकास कळविले व आगीवार नियंत्रण मिळविण्यासाठी धाव घेतली बघता बघता स्थानिक व्यापारी नागरिक व स्थानिक पोलीस जमलेल्यांनी जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून दुकानाचे शटर उघडून पाण्याचा मारा केला.
२० ते २५ मिनिट आग विझवन्यासाठी शर्थिचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणून विझवली.सोबतच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असले तरी होणारे नुकसान ते टाळू शकले नाही परंतु या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जावेद मणेर यांच्या दुकानातील बांगड्या, गाठवनीचे साहित्य, स्टेशनरीचे साहित्य,लाकडी काचेचे कपाटे इतर सामान जळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले…