आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
गुरसाळे येथे आरक्षण प्राप्तीचा मराठा बांधवांचा जल्लोष
शाही मिरवणूक गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी

गुरसाळे येथे आरक्षण प्राप्तीचा मराठा बांधवांचा जल्लोष
गुरसाळे-प्रसाद चिंचकर
गुरसाळे तालुका खटाव येथे मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याने मराठा बांधवांनी मोठ्या जल्लोषात विजयी मिरवणूक काढली .
ढोल ताशांच्या गजरासह प्रतिकात्मक शिवाजी महाराजांची घोड्यावरून वाजत गाजत व आतिषबाजीसह मिरवणूक काढली. मराठा बांधवांनी एकत्र येत इतिहासाची साक्ष दाखवून दिली की मराठा बांधव एकत्र आले तर पुन्हा इतिहास घडू शकतो हे सिद्ध करून दाखवले
या इतिहासाचा विजय उत्सव साजरा करण्यासाठीच गुरसाळे नगरीत मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला यावेळी आपण असेच एकत्र राहून गावाचा विकास करूया अशा प्रकारची भावना मराठा बांधवांनी याप्रसंगी व्यक्त केल्या