वडूज पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

वडूज पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
कोणतेही धागदोरे नसताना चोरांच्या आवळल्या मुसक्या
मायणी –महेश तांबवेकर
खटाव तालुक्यातील कातरखटाव ,तडवळे येथे भर दिवसा सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी झाल्याने याबाबत नागरिक भयभीत होते पण अखेर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या टीमने अतिशय खडतर प्रयत्नातून कोणतेही धागेद्वारे नसताना या चोरीचा उलगडा करत चोरांच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे कातरखटाव येथे रमेश बागल यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी उघडून घरातील सहा तोळे सोने व रोख रक्कम तसेच तडवळे तालुका खटाव येथील नवनाथ ढोले यांच्या बंद घराचा कोंयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याविरुद्ध वडूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्याबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करून तेथील परिसरातील बारकाईने पाहणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासात सुरुवात केली असता कराड सूर्यवंशी मळा येथील इब्राहिम अब्बास अली शेख वय 25 याने चोरी केल्याचे मान्य केले यावेळी इब्राहिम अब्बास अली शेख यावर तीन दिवस साध्या वर्षात पोलिसांनी नजर ठेवली व तो आपल्या मूळ गावी कर्नाटक मध्ये जात असताना कराड येथील कार्वे नाक्यावर पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले
यापूर्वी सदर आरोपीविरुद्ध कराड तालुका उंब्रज ढेबेवाडी पोलीस स्टेशन तसेच कासेगाव विटा चिंचणी वांगी जिल्हा सांगली व कोडोली जिल्हा कोल्हापूर येथे एकूण सात घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत
सदर कारवाईस मा. समीर शेख पोलीस अधीक्षक, डॉ. मा.वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा ,उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक तसेच रूपाली मोरे, सब पोलीस निरीक्षक रामचंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रणधीर कर्चे,पोलीस हवालदार शिवाजीराव खाडे, शशिकांत काळे ,अमोल चव्हाण, किरण चव्हाण, मोहन नाचन ,प्रमोद चव्हाण, गजानन तोडकर ,प्रशांत ताटे ,पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे ,कुंडलिक कटरे ,सत्यवान खाडे ,जयदीप लवळे ,प्रीती पोतेकर ,दीनानाथ जाधव ,अमोल निकम व पोलीस पथक यांनी केली आहे