आपला जिल्हा

आमदार मनोजदादा घोरपडे यांचा रहिमतपूर मध्ये जनता दरबार

जनता दरबारात २५० नागरिकांचे प्रश्न जागेवरच निकाली

आमदार मनोजदादा घोरपडे यांचा रहिमतपूर मध्ये जनता दरबार

जनता दरबारात २५० नागरिकांचे प्रश्न जागेवरच निकाली

Download Aadvaith Global APP

रहिमतपूर – विशेष प्रतिनिधी

उत्तर कराडचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रहिमतपूर तालुका कोरेगाव येथे जनता दरबार आयोजित केला होता याबद्दल आणि भरघोस मतांनी विजयी केले त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी हा जनता दरबार भरवण्यात आला होता
या दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन हजेरी लावली होती याच बरोबर  विविध विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उत्तर कराड मतदार संघातील रहिमतपूर सह वाठार किरोली जिल्हा परिषद गटातील नागरिकांचे प्रश्न यावेळी जागेवरच निकाली निघाल्याने उपस्थितांच्यात समाधानाचे वातावरण होते

कोरेगाव तालुक्यातील समाविष्ट गावांसाठी असलेल्या जनता दरबारामध्ये एकूण 333 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यापैकी 250 तक्रारींवर जागेवर निर्णय घेण्यात आले. 83 तक्रारी प्रलंबित असून त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिले आहेत. 

यावेळी पंचक्रोशी शिक्षण संस्था अध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका, माजी नगराध्यक्ष संपत दादा माने, विरोधी पक्षनेते निलेश माने, प्रकाश बापू माने, ॲड. विजयसिंह शिंदे, राजेंद्र घाडगे,प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ.संगमेश कोंडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता, भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सातारा आगाराचे व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, गटशिक्षणाधिकारी यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख , रहिमतपूर शहर, वाठार किरोली जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.
कार्यक्रमासाठी रणजित माने, विकास गायकवाड, सोमनाथ निकम, शंकर भोसले, विक्रमनाना घोरपडे , प्रवीण भोसले, ऋषींकेश तूपे, तुषार चव्हाण, सुहास माने, जयवंत माने, शेखर माने,सचिन काटे आधी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक

सामाजिक सांकृतिक राजकिय कृषी व खेळ जगत बातम्यांचे व्यासपीठ भागातील बातम्या पाहण्यासाठी youtube channel==lokpravah news संपादक -- महेश तांबवेकर = 7709797534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button