तन मन धनाने समाजाची पाठराखण करणार : सुरेंद्रदादा गुदगे
बसवभूषण जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांची उपस्थिती संपन्न

तन मन धनाने समाजाची पाठराखण करणार : सुरेंद्रदादा गुदगे
बसवभूषण जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांची उपस्थिती संपन्न
सातारा~~ विशेष प्रतिनिधी
सामाजिक विकासाठी तसेच आत्मउन्नतीसाठी सामाजिक एकता असणे गरजेचे आहे व ती एकता वाढीच्या दृष्टीने जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपणास काम करण्याची गरज आहे. यासाठी समाजातील तरुणांनी समाजकार्यात सहभागी होऊन आपले योगदान देण्याची गरज आहे. त्यात मी स्वतः समाजाची पाठीशी तनमन धनाने समाजाची पाठराखण करणार असे प्रतिपादन मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे यांनी केले. ते महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ, सातारा यांच्यावतीने बसवभूषण जीवनगौरव पुरस्काराच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
त्यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष व विरशैव बँकेचे मार्गदर्शक सुनील रुकारी, माजी प्राचार्य राजेंद्र शेजवळ,उद्योजक डॉ.राजेंद्र घुटे, राष्ट्रीय लिंगायत संघाचे प्रदीप वाले, सामाजिक सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सागर कस्तुरे, उपाध्यक्ष श्रीनिवास कामळे, सचिव महादेव मेंडीगेरी, कोषाध्यक्ष सिद्धराज शेटे,भारत बारवडे, नंदकुमार गुरसाळे उपस्थित होते.
यावेळी समाजभूषण पुरस्कार प्रकाश गवळी, व्यापार भूषण पुरस्कार शामराव बाजारे, वैद्यकीय भूषण पुरस्कार डॉ सुधाकर बेंद्रे, कृषी भूषण संजय टकले, माहेश्वर भूषण पुरस्कार महेश स्वामी यांना प्रदान करण्यात आला.
त्यावेळी गुदगे म्हणाले, साताऱ्यात माझे बालपण गेले असून आपण गेली 30 वर्ष समाजकारण व राजकारण काम करत आहे. वडील कै. भाऊसाहेब गुदगे यांनी अल्पसंख्याक समाजातील असूनही सर्वांना सोबत घेत विधानसभेत चार वेळा प्रतिनिधित्व केले. तोच राजकीय वारसा आपण चालवीत आहे. बॅकेचे मुल्यमापन हे केवळ नफ्यावर न करता, बॅकेने किती कुटूंब स्वावलंबनाने उभी केली, यावरच खरे बॅकेचे यश आहे. समाजातील जिद्दी व चिकाटीच्या तरुणांना तारणापेक्षा कारणाला महत्व देऊन मायणी अर्बन बॅक कर्ज त्यांच्या पाठीशी उभी केली जाईल. असे अभिवचन त्यानी दिले.
बसव आण्णांनी पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना सन्मान मिळवून दिला. अहिंसेची शिकवण समाजाला दिली.अनिष्ठ प्रथांना मूठमाती दिली. वचन साहित्याचा मोठा ठेवा दिला. त्याच मार्गावर समाजाने चालत राहिले पाहिजे. समाजातील प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की, समाजाने आपल्याला काय दिले ? यापेक्षा आपण समाजाला काय दिले ? हे महत्त्वाचे आहे. भविष्यात आपणही समाजातील तरुणाना सोबत घेवून समाजाच्या पाठीशी तनमन धनाने उभे राहणार आहे. सागर कस्तुरे व मंडळातील सदस्यांनी सुरु केलेला पुरस्कार समाजातील लोकांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी प्राचार्य शेजवळ म्हणाले, सेवा मंडळाने समाजातील त्यागी व निस्वार्थीपणे काम करणाऱ्याना बसव भूषण पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. समाज उन्नतीसाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे. त्यावेळी सुनिल रुकारी, प्रदिप वाले यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ॠत्विक गुदगे, सुभाष शेटे, सुभाष ताटे, किरण लखापती,निर्मला बारवडे, ॲड. सुवर्णा कवारे, सोमनाथ येवले, रवींद्र गाढवे, संजय येवले,रमेशचंद्र भादिर्गे, रघुनाथ राजमाने, विजय शेटे, ॲड. अशोक येवले, श्रीहरी अंबिके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महादेव मेंडीगेरी केले तर स्वागत सुभाष ताटे व आभार सिद्धराज शेटे यांनी मानले