मायणीच्या यशवंत विकास सोसायटीचे कार्य कौतुकास्पद —- सुरेंद्र गुदगे
यशवंत विकास सोसायटीच्यावतीने ट्रॅक्टर वितरण

. मायणीच्या यशवंत विकास सोसायटीचे कार्य कौतुकास्पद —- सुरेंद्र गुदगे
यशवंत विकास सोसायटीच्यावतीने ट्रॅक्टर वितरण
मायणी–प्रतिनिधी
मायणीच्या यशवंत विकास सोसायटीने आजपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून यशवंत विकास सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
ते यशवंत विकास सेवा सोसायटी मायणी ता. खटाव यांच्या वतीने येथील शेतकरी भिमराव महादेव माळी यांना ५लाख ७०हजार रुपये किमतीच्या ट्रॅक्टरचे वितरण सुरेंद्र गुदगे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतानाबोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन अनिल माळी, व्हाईस चेअरमन नाथबाबा सानप, सरपंच प्रतिनिधी रणजीत माने, उपसरपंच दादासाहेब कचरे, बाजार समितीचे संचालक स्वप्निल घाडगे, ग्रा.पं. सदस्य ऋत्विक गुदगे, अरुण जाधव, सर्व संचालक, मायणी अर्बन बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत निकम, सचिव धनाजी माळी विकास अधिकारी शांताराम पवार शाखाप्रमुख सुनील अभंग व संस्थेचे सभासद उपस्थित होते
सुरेंद्र गुदगे पुढे म्हणाले ,जागेच्या अडचणीमुळे अनेक वर्षांपासून सोसायटीला आपला कारभार अडचणीच्या जागेत करावा लागत असे ही बाब लक्षात घेऊन सोसायटीने नवीन इमारत बांधण्याचा संकल्प केला असून त्यासाठी जागा खरेदी केलेली असून लवकरच सोसायटीच्या नूतन इमारतीच्या कामास प्रारंभ होईल. हा सोसायटीच्या प्रगतीतील एक मोठी बाब आहे.
सोसायटीचे चेअरमन अनिल माळी यावेळी माहिती देताना म्हणाले, यशवंत विकास सोसायटीने सातत्याने ए ग्रेड दर्जा प्राप्त केला असून आज अखेर नऊ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. शंभर टक्के कर्ज वसुली झाली असून 31 मार्च अखेर 30 लाख 46 हजार रुपये नफा झाला आहे