पडळ साखर कारखान्याचा दि. २६ रोजी पाचव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम.

पडळ साखर कारखान्याचा दि. २६ रोजी पाचव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम.
मायणी — प्रतिनिधी
खटाव-माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड पडळ ता. खटाव या कारखान्याचा पाचवा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपण सोहळा मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कारखाना स्थळावर होणार असल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर अशोक नलवडे यांनी दिली.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता वाढीव गाळप क्षमतेच्या झिरो मिल रोलर पूजन व हंगाम २०२३-२०२४च्या पाचव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपण सोहळा कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे अध्यक्षतेखाली आणि को- चेअरमन मनोज दादा घोरपडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. समता मनोज घोरपडे यांचे शुभ हस्ते आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर अशोक नलवडे यांनी दिली .सदर बॉयलर प्रदीपणाच्या कार्यक्रमास कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे ,संचालिका कु. प्रीती घार्गे, संचालक विक्रम घोरपडे, कृष्णत शेडगे, महेश घार्गे यांच्या सह सर्व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
खटाव- माण तालुक्यामध्ये उभारण्यात आलेल्या या साखर कारखान्याची क्षमता २५०० मे.टन प्रतिदिन आहे .मात्र व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे तो ४७०० मे. ह्मप्रतिदिन प्रमाणे ऊस गळीत करत आहे. परंतु नव्या वाढीव झिरो मिलमुळे ही क्षमता ६५०० मे.टन प्रति दिन होणार आहे .कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यातून प्रतिदिन एक लाख लिटर इथेनॉल उत्पादित केले जाणार आहे. कारखाना हंगामामध्ये ज्यूस पासून तर बिगर हंगामामध्ये बी हेवी पासून इथेनॉल तयार केले जाणार आहे. याशिवाय को-जन प्रकल्प कारखाना सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून उत्तम रीतीने चालू आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व पर्यावरण पूरक प्रकल्प उभा होत आहे. दरम्यान या बॉयलर अग्नीप्रदीपण समारंभावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून श्री गणेशाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.