आज पासून मायणीत सरुताईंचा उत्सव सोहळा
मंगळवारी रथोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम

आज पासून मायणीत सरुताईंचा उत्सव सोहळा
मंगळवारी रथोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम
मायणी -प्रतिनिधी
मायणीतील संत मातोश्री सरुताईंचा ११ वा पुण्यस्मरण सोहळा उद्यापासून (शनिवार) तीन ऑक्टोबरअखेर आयोजिल्याची माहिती मातोश्री ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर यांनी दिली.
आज सकाळी ९ वाजता मातोश्री सरुताईंच्या लीलाअमृत या ग्रंथाचा पारायण सोहळा, पहाटे सहा वाजता पाद्यपूज, सकाळी सात वाजता आरती सकाळी ९ नामस्मरण, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी एक ते तीन महिला भजन, सायंकाळी तीन ते पाच आम्ही मैत्रिणी मंगळागौर हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रात्री सात वाजता हभप नवनीत महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
एक ऑक्टोबर रोजी दुपारी तीनवाजता संतोष वरुडे प्रस्तुत सप्तसुरांपलीकडे ऑर्केस्ट्रा आणि सन्मान नारीशक्तीचा चला खेळूया खेळ पैठणीचा, सायंकाळी सात वाजता हभप सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी (ता. २) दुपारी तीन वाजता प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान, संध्याकाळी सात वाजता हभप मच्छिंद्र महाराज कावडे यांचे कीर्तन होणार आहे.
तीन ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच ते सव्वाचार या वेळेत माणिक महाराज यांचे फुलाचे कीर्तन होणार असून, फुलाची वेळ पहाटे ४.३२ आहे. पहाटे ओमदत्त चिले महाराज भजनी मंडळ कोळेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम, सकाळी १० वाजता हभप गणेश महाराज डांगे यांचे काल्याचे कीर्तन होईल. सकाळी ११ वाजता ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.. दिलीप येळगावकर व त्यांच्या पत्नी डॉ. ऊर्मिला येळगावकर यांच्या हस्ते पालखी व रथ सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. या वेळी खासदार संजय पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, संजीव साळुंखे, चंद्रकांत घाडगे आदी उपस्थित राहणार आहेत.