वांग्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम –कृषी कन्यांचा नवोपक्रम

वांग्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम –कृषी कन्यांचा नवोपक्रम
मायणी दि 2 प्रतिनिधी
कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी कन्यांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी खास चर्चासत्राचे आयोजन केले होते या निमित्ताने त्यांनी वांग्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले
डॉ शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषीकन्यांनी खुंटे तालुका फलटण येथे या चर्चासत्राचे आयोजन केले होते या निमित्ताने रांगोळी रेखाटन तसेच येथील विद्यालयात निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते
या प्रात्यक्षिकात कृषीकन्या साक्षी दळवे सुष्मिता कारंडे सायली काटे प्रगती पाटील वैष्णवी पाटील व पूजा फडतरे यांनी सहभाग घेतला होता
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख संतोष गोडसे यांनी खरीप हंगामातील पिकांचे नियोजन व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले येथील विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत राधिका खलाटे ,हिरकणी भोईटे ,ऋतुगंधा रणवरे ,नेहा खलाटे व रुद्र भंडलकर यांनी पारितोषिक प्राप्त केलेया
कार्यक्रमासाठी सरपंच हणमंत भिसे उपसरपंच सौ रुपाली खलाटे कृषी सेविका तृप्ती शिंदे ग्रामसेवक अंगराज जाधव ,अविनाश खलाटे प्रगतिशील शेतकरी तानाजी खिलारे ,नारायण जगताप ,रामराजे खलाटे तसेच गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते उपस्थितांचे आभार सुष्मिता कारंडे हिने मानले