जिद्दीने व चिकाटीने व्यवसायात यश मिळते -कुलकर्णी

जिद्दीने व चिकाटीने व्यवसायात यश मिळते -कुलकर्णी
आटपाडी-प्रतिनिधी
जिद्दीने व चिकाटीने व्यवसाय केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन माधवराव कुलकर्णी यांनी केले ते पुढे म्हणाले युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंदे करुन आपले व आपल्या गावाचे नाव कमवावे
आटपाडी येथे आयोजित कृषी पदवीधर मेळावा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तसेच उद्योजकता कार्यशाळा या कार्यक्रमात उद्योजकता मार्गदर्शन या विषयावर ते बोलत होते स्वावलंबी भारत अभियान कोल्हापुर विभाग समन्वयक उद्योजक माधवराव कुलकर्णी यांनी युवकांना अवाहन करत ते पुढे म्हणाले की, आज स्पर्धा परिक्षेमध्ये खुप मोठी स्पर्धा निर्माण झाली असुन सध्या शासनाच्या विविध विभागामध्ये नोकरीच्या जागा नगण्य असुन परिक्षा देणारांची संख्या लाखोंच्या आकडयामध्ये आहे त्यामुळे लाखो युवकांमध्ये नैरश्याची भावना निर्माण होवुन अपयश येत आहे त्यामुळे समाजातील अस्थिरता व आर्थिक दरी संपवण्यासाठी युवकांनी वेगवेगळया क्षेत्रामध्ये व्यवसायात संधी निर्माण करावी.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे औसा, लातुर येथील न्यायाधिश सुभाष फुले म्हणाले की, सध्या बाजारात सेंद्रिय अन्नाची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे गरजु युवकांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करावी व आपला शेती माल आकर्षक पॅकिंग करुन विकल्यास जादा पैसे मिळतील असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अॅड. धनंजय पाटील यांनी केले यावेळी ते म्हणाले की, गेली २६ वर्षे सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करत असुन पंचक्रोशीमधील युवकांना स्पर्धा परिक्षाचे मार्गदर्शन देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची प्रेरणा घेवुन यश प्राप्त केले आहे.
नागपुरचे उपजिल्हाधिकारी निलप्रसाद चव्हाण कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, युवकांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाबरोबरच पर्यायी बी प्लॅन तयार ठेवावा.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रेयश पाटील यांनी केले तर आभार शेती परिवार संस्थेचे अध्य प्रसादराव देशापांडे यांनी मानले