
मायणी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेश जाधव उपाध्यक्ष पांडूरंग तारळेकर कार्याध्यक्ष महेश तांबवेकर
मायणी -प्रतिनिधी
मायणी तालुका खटाव येथील मायणी पत्रकार संघाची वार्षिक बैठक खटाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश सुरमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत सन २०२५ सालासाठीची कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी महेश जाधव यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी -पांडुरंग तारळेकर यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी- महेश तांबवेकर सचिव- तानाजी चव्हाण खजिनदार -मारुती पवार तर मार्गदर्शक- म्हणून प्रकाश सुरमुख व संजय जगताप
यावेळी महेश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात विविध सामाजिक कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याचा संकल्प बोलून दाखवला या बैठकीस प्रकाश सुरमुख ,पांडुरंग तारळेकर ,महेश तांबवेकर, संजय जगताप, महेश जाधव, मारुती पवार ,तानाजी चव्हाण हे उपस्थित होते. नूतन कार्यकारणीचे मान्यवरांनी स्वागत व अभिनंदन केले