ऑनलाईनच्या नादात झाला आयुष्याचा गेम पोलिसांचा लागला बरोबर नेम
संशयित चोरांकडून दोन दुचाकी जप्त

ऑनलाईनच्या नादात झाला आयुष्याचा गेम पोलिसांचा लागला बरोबर नेम
संशयित चोरांकडून दोन दुचाकी जप्त
मायणी —- प्रतिनिधी
ऑनलाइन गेम खेळात नुकसान झाल्यामुळे मोटरसायकली चोरणाऱ्या संशयित चोरट्यास मायणी पोलिसांनी सापळा रचून अत्यंत शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून रुपये एक लाख पंधरा हजार रुपये चा दोन मोटरसायकलींचा माल हस्तगत केला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- मायणी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अजित काळेल यांना गोपनीय माहितीदारा मार्फत एक मुलगा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना सांगितल्यानंतर त्यांनी मायणी पोलीसत्ता बनावट ग्राहक पाठवून योग्य सापळा लावून कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले.
पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांनी पेहराव बदलून त्यास मध्यस्थामार्फत मोटरसायकल खरेदी करावयाची आहे असे गोपनीय बातमीतील संशयित जो दुचाकी चोरणाऱ्या मुलासोबत खरेदीदार हा बनावट ग्राहक अथवा पोलीस असल्याचे किंचितही संशय येणार नाही अशा पद्धतीने संपर्क साधला. सदर वेळी मोटरसायकल चोरणाऱ्या मुलाने सुरुवातीला त्याचे ताब्यातील मोटरसायकल विक्री करण्याकरता मायणी येथे, नंतर बनपुरी ता. खटाव व नंतर धोंडेवाडी ता. खटाव येथे बोलाविले. त्यानंतर दिनांक 31 जानेवारी रोजी संशयित मुलगा धोंडेवाडी गावी दुपारी बाराच्या सुमारास स्प्लेंडर कंपनीची एक मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन आला. बनावट ग्राहक प्रदीप भोसले व संशयित मुलगा यांची बोलणी सुरू असतानाच बाजूला पंचासह दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायणी पोलीसांनी त्यास मोटरसायकलसह ताब्यात घेतले.
सदर संशयित आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयित मुलाचे नाव शुभम राजू निकम वय वर्ष 20 राहणार माहुली ता. खानापूर.जिल्हा. सांगली येथील असल्याचे समजले. त्याने सदरची मोटरसायकल ही दि. 30 जानेवारी रोजी रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांचे घरासमोरून चोरून आणल्याचे सांगितले. यावरून पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळी करता पोलीस ठाणे वडूज येथे सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विक्रीसाठी आणलेली मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे त्यानंतर अधिक चौकशी केर्ता असता सदर आरोपी याने दुसरी मोटरसायकल क्रमांक एम.एन. 11 सी.पी. O 457 ही सातारा येथून चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून सदर दोन मोटारसायकली असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा माल हस्तगत केला . सदर आरोपीस चोरी करण्याचे कारण विचारले असता आपण प्रोबो ऑनलाईन गेम खेळल्याने माझे फार नुकसान झाले असून मला पैसे कमी पडल्याने मी मोटरसायकल चोरी केल्याचे त्याने सांगितले.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस ,अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडूकर ,अप्पर पोलीस अधीक्षक ,सातारा ,अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी ,दहिवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस हवालदार नाना कारंडे, शशिकांत काळे, आनंदा गमरे ,अमोल चव्हाण, पोलीस नाईक प्रवीण सानप, पोलीस कॉन्स्टेबल बापू शिंदे ,प्रदीप भोसले ,संदीप खाडे, अजित काळेल व प्रियंका सजगणे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास मायणी पोलीस दूरक्षत्राचे पोलीस हवालदार नानासाहेब कारंडे करीत आहेत.