ग्राम सुरक्षा यंत्रणेने आपत्कालीन परिस्थितीवर मात करता येणार – डी के गोरडे

ग्राम सुरक्षा यंत्रणेने आपत्कालीन परिस्थितीवर मात करता येणार – डी के गोरडे
पुसेगाव-प्रतिनिधी
एकाच कॉल मध्ये गावात व पंचक्रोशीत आपत्कालीन परिस्थितीची सूचना ग्राम सुरक्षा यंत्रणा या मार्गाने प्रभावीरीत्या कार्यान्वित होणार असून, गावोगावच्या नागरिकांनी या यंत्रणेचा फायदा घ्यावा व आपल्या गावात व परिसरात घडणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्याचे आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे मार्गदर्शक डी के गोरडे यांनी केले.
पुसेगाव तालुका खटाव येथील सेवागिरी मंगल कार्यालय येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यशाळेचे आयोजन पुसेगाव पोलीस स्टेशन व ग्राम सुरक्षा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनी आशिष कांबळे, गोपनीय विभागाचे अमोल जगदाळे, इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना व मार्गदर्शन करताना डि के कोरडे म्हणाले आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी रित्या कार्यरत करण्यासाठी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कार्यशाळा आहे. आपत्कालीन परिस्थितीत द्यायचा सूचना, चोरी दरोड्याची घटना, महिला संदर्भातील गुन्हे, गावातील ग्रामसभा,आरोग्याच्या दृष्टीने असणाऱ्या आरोग्य विभागाच्या महिलांच्या आरोग्य शिबिर, राशन दुकानदार यांना घ्यावयाची ग्राहकांना माहिती, वाहन चोरी,लहान मुले हरवणे, आगजळीताची घटना यासारख्या घटनेबाबत एकाच कॉल मध्ये सर्वांच्या मोबाईल द्वारे माहिती कशी पोहोचवली जाते, त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवली आणि येत्या काळामध्ये या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून या सर्व गोष्टीवर आळा बसण्यास निश्चित मदत होणार असल्याचे सांगितले. प्रारंभी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनी आशिष कांबळे यांनी प्रास्ताविकामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून मिळणारी माहिती याबद्दल आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास गाव गावचे सरपंच, पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, तसेच पत्रकार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.