राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज औंध येथे शिक्षक – पालक मेळावा संपन्न.

राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज औंध येथे शिक्षक – पालक मेळावा संपन्न.
प्रतिनिधी – समद आत्तार
दिनांक ३-१०-२०२३ रोजी शिक्षक इ .12 वी कला व विज्ञान वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख जाणून घेणे साठी शिक्षक पालक मेळावा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक संजय निकम होते. विद्यार्थ्यांनी आपला भविष्यकाळ चांगला असावा असे वाटत असेल तर वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासात लक्ष घालावे व पालकांनीही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ देणे गरजेचे आहे असे ते म्हटले. उपप्राचार्य प्राध्यापक गुजर सर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले तसेच वर्षभरामध्ये द्यावयाच्या परीक्षांचेही नियोजन त्यांच्यापुढे ठेवले.
उप प्राचार्य प्रदीप गोडसे यांनीही पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ चांगला जाण्यासाठी पालकांनी थोडा त्रास घेतलाच पाहिजे.विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करण्यासाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांनीही थोडे लक्ष घातले पाहिजे असे ते म्हटले. मोबाईलचा वापर पूर्णपणे बंध केल्यास मुलांची शैक्षणिक प्रगती होईल व त्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल. तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या घरात दररोज सायंकाळी दोन तास टी.व्ही.व मोबाईल बंद ठेवून मुलांचा अभ्यास घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजय निकम (सहसचिव ),प्रमुख उपस्थिती सौ. शारदा पिसाळ (पालक प्रतिनिधी), उपप्राचार्य प्रा. गुजर सर, उपप्राचार्य प्रा. प्रदीप गोडसे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक पालक मेळावा कमिटीचे प्रमुख प्राध्यापक जगदाळे सर यांनी केले. या कार्यक्रमास सर्व 12 वी चे वर्गशिक्षक उपस्थित होते.तसेच मेळाव्यास पालकांची उल्लेखनीय उपस्थिती होती.सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत चोरगे यांनी केले तर आभार प्राध्यापक बंडगर सरांनी व्यक्त केले.