खटाव-माण तालुका अग्रो प्रो. लि. पडळच्या तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ .

खटाव-माण तालुका अॅग्रो प्रो. लि. पडळच्या तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ .
मायणी — प्रतिनिधी
खटाव-माण तालुका अॅग्रो प्रो. लि. साखर कारखाना पडळच्या सन २०२४-२५च्या गळीत हंगामाच्या तोडणी वाहतूक करण्याचा कराराचा शुभारंभ पडळ ता.खटाव येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे, को-चेअरमन मनोज घोरपडे व कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कारखाना सुरू होण्यापूर्वी तोडणी वाहतूक करणे गरजेचे असते. प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी प्रमुख कामगारांच्या उपस्थितीत तोडणी वाहतूक करार संपन्न झाला.यावेळी कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे, कृष्णात शेडगे, महेश घार्गे ,सौ. प्रीती घार्गे- पाटील, टेक्निकल संचालक सनी क्षीरसागर ,नरेंद्र साळुंखे, जनरल मॅनेजर काकासाे महाडीक, शेती अधिकारी किरण पवार, चीफ इंजिनियर सुभाष मोहिते ,चीफ केमिस्ट गोरख कदम, चीफ अकौंटंट अजित मोरे, पुरवठा अधिकारी शिदोबा महाडिक, तसेच तोडणी वाहतूकदार उत्तम धनावडे, राजीव बरकडे ,पांडुरंग खरात, रामचंद्र मेटकरी, राजाराम पडळकर, प्रकाश काळे, राजेंद्र शेंडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सन २०२३-२४ च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने ६लाख १८ हजार मेट्रिक टन गाळप केले. तसेच साखर उतारा ११.६८ % राहिल्याने साखर उत्पादन ६ लाख ७० हजार १४० क्विंटल एवढे विक्रमी झाले. या कामी कारखान्याचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी व कामगार वर्ग यांच्या सहकार्यातून हे उत्पादन करण्यात आल्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे यांनी सांगितले