भवतालाशी एकरूप झालेल्या संवेदनशीलतेतून साहित्यनिर्मिती होते :बाळासाहेब कांबळे

भवतालाशी एकरूप झालेल्या संवेदनशीलतेतून साहित्यनिर्मिती होते :बाळासाहेब कांबळे
विटा:प्रतिनिधी
“आपली माती आणि माणसांच्य सामाजिक,भौगोलिक भवतालाशी एकरूप झालेल्या संवेदनशीलतेतून साहित्याची निर्मिती होत असते .’भिनवाडा’हे अशाच माणसांच्या अनाम जगण्याचे चित्रणआहे.आजच्या अस्वस्थ वर्तमानात नव्या बदलांना सामोरे जाताना सामाजिक वर्तमान समजून घेण्यासाठी नव्या पिढीने साहित्याशी नाळ जोडली पाहिजे.”असे प्रतिपादन लेखक बाळासाहेब कांबळे यांनी केले.बळवंत कॉलेज विटा यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘वाङ्मय निर्मिती’याविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास उपप्राचार्य.प्रा.आनंदराव खाडे ,कवयित्री कुंदा लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.दिनेश वाघुंबरे म्हणाले,”मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांना वाङ्मय निर्मिती प्रक्रिया माहीत करून देण्यासाठी आपल्या परिसरातील लेखकांच्या मार्गदर्शनाचे व मुलाखतीचे आयोजन केले आहे.”प्रा.होवाळे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. सुनील बुद्धनवार,प्रा. ठाणेकर मॅडम,व मराठी विभाग विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.