पुसेसावळी गावचे आराध्यदैवत श्री तुळजाभवानी देवी वार्षिक रथोत्सव पार पडला..

पुसेसावळी गावचे आराध्यदैवत श्री तुळजाभवानी देवी वार्षिक रथोत्सव पार पडला..
पुसेसावळी प्रतिनिधी :- समद आत्तार
पुसेसावळी ता. खटाव आराध्यदैवत श्री तुळजाभवानी वार्षिक रथोत्सव आई उदो उदो तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं च्या गजरात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सकाळी महेश कारंडे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. गुरुवर्य दादा महाराज व मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज यांच्याहास्ते रथपूजन करून श्री तुळजाभवानी उत्सवमूर्तीची ग्रामप्रदशीनेसाठी रथामध्ये स्थापना करण्यात आली. यावेळी मा. आ. प्रभाकर घार्गे, जि. परिषद माजी सदस्य जितेंद्र पवार, माजी सभापती चंद्रकांत पाटील(दादा), सी. एम. पाटील,सुरेशबापू पाटील, सह्याद्री कारखाना संचालक संतोष घार्गे, सरपंच दत्तात्रय रुद्रके, सचिन कदम, शहाजी माळवे, अध्यक्ष रवींद्र कदम, दत्तात्रय कदम, सूर्यकांत कदम, संतोष कदम, गणेश पंडित, संग्राम पाटील, किरण कदम, महेश कदम पप्पू, यात्रा समिती पदाधिकारी व ग्रामस्थ भाविक मोठया संख्येने उपस्थिती होते.
आज रविवारी दु. ४ वाजता कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले असुन, प्रथम क्रमांक एक लाख इनमासाठी पै. संग्राम पाटील व पै सुबोध पाटील यांच्यात लढत होणार आहे, सोबतच ७५हजार,५१हजार,४१हजार,२५हजार,१५ हजारांच्या इनामी कुस्त्या होतील.