यशवंतबाबांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

यशवंतबाबांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
मायणी प्रतिनिधी
मायणीच्या यशवंतबाबांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न भक्तिमय वातावरणात भाविकांनी घेतले बाबांचे दर्शन घेतले श्री सद्गुरू यशवंतबाबा महाराज की जय’च्या घोषाने वातावरण भक्तिमय झाले पहाटे समाधी मंदिरात अभिषेक पूजा पाठ झाला
फुलांनी सजवलेल्या रथात महाराजांचा प्रतिमा व पादुका ठेउन रथोत्सवास प्रारंभ झाला यावेळी रथाचे पूजन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, देवस्थान ट्रस्टचे खजिनदार व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी चेअरमन काकासाहेब माने, सचिव द. ग. माने, विश्वस्त उमेश माळी, आबासाहेब माने, रणजित माने, सरपंच सोनाली माने, उपसरपंच दादासाहेब कचरे, यात्रा कमिटीचे चेअरमन गोरखनाथ ऊर्फ बंडा माने, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभनाताई गुदगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, हरणाई सूतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संदीप मांडवे, चंद्रकांत पवार, स्वप्नील घाडगे, अनिल माळी, रणजित माने, विजय शिंदे, राजेंद्र जुगदर, प्रा. बंडा गोडसे, युवराज बिटले, अभय देशमुख, उस्मान तांबोळी, श्रीकांत काळे, प्रा. सदाशिव खाडे, उपस्थित होते.
रथोत्सव हा बेंजो भजनी मंडळ तसेच सुवासिनी भक्तगण यांचे सह गावातूनमुख्य रस्त्यावरुन ग्रामप्रदक्षिणा करत संपन्न झाला रथावरती भाविकांनी नारळाची तोरणे नोटांची तोरणे बांधली ठीक ठिकाणी रथाच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या .यात्रा कालावधीत कोणताच अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला.