Phone Pay द्वारे तब्बल 1,19,200 रुपयांची फसवणूक

Phone Pay द्वारे तब्बल 1,19,200 रुपयांची फसवणूक
प्रतिनिधी :- समद आत्तार
पुसेसावळी येथे १०/०९/२०२३ रोजी दंगलिमध्ये मयत झालेल्या हसन लियाकत शिकलगार याच्या पत्नीस व तिच्या होणाऱ्या अपत्याच्या भवितव्या साठी मदत मिळावी म्हणून वसीम महमूद कुमानदन रा. कोल्हापूर याने KETTO ORGANIZATION कोल्हापूर द्वारे सुरु केलेल्या नुरूलहसन शिकलगार pregnant Wife campingn व इतर organization द्वारे तुम्हाला पैश्यांची मदत मिळवून देतो असे फिर्यादी सांगुन फिर्यादीस आश्वासन देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन करून दिनांक ०५/१०/२०२३ ते ११/१०/२०२३ पर्यंतच्या मुदतीत वेळोवेळी रक्कम १,१९,२००/-वसीम कुमादन यांनी फिर्यादीकडुन घेतले असुन वसीम कुमादन यांचेकडे त्यांच्या पैश्याची मागणी केली असता त्यांनी ते फिर्यादीस परत देण्यास टाळाटाळ करून फिर्यादीचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली म्हणून त्यांचे विरुद्ध औंध पोलीस ठाणेत गुन्हा रजिस्टर ३१४/२०२३ भादवीस कलम ४२०,४०६ अन्वये गुन्हा रजिस्टर करण्यात आला असुन याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोरड व पोलीस उपनिरीक्षक ए.ए. ठिकणे करीत आहेत.