पुसेसावळी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे आ.मनोज घोरपडे यांचे हस्ते लोकार्पण

पुसेसावळी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे आ.मनोज घोरपडे यांचे हस्ते लोकार्पण
पुसेसावळी — लोकप्रवाह वृत्तसेवा
पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 2011 रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गरोदर माता आणि एक वर्षाच्या पर्यंत बालकांना तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी 102 संपर्क क्रमांक असलेली टाटा सुमो दिली होती त्याचे शासकीय नियमाने किलोमीटर पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने फोर्स कंपनीची एम एच 11 डी डी 8331 ही 102 क्रमांक असलेली रुग्णवाहिका गरोदर माता व एक वर्षाच्या बालकांना वैद्यकीय उपचारासाठी देण्यात आली ही 102 नावाने देण्यात आलेली रुग्णवाहिका हिचे पूजन करून लोकार्पण कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम वर्धन कारखान्याचे संचालक विक्रमशील कदम सरपंच सौ सुनंदा नामदेव पिसे डॉ. युनिस शेख तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य पुस्तके , डॉ. दीक्षा पांढरबळे , डॉ. तुषार खाडे वैद्यकीय अधिकारी तसेच वैशाली गुजर,बी एन घाडगे आरोग्य सहाय्यक अनिल बोटे औषध निर्माण अधिकारी आणि महेंद्र खोत,शुभांगी माळी पुष्पा खैरमोडे ,ज्योती शिंदे, नयन पंडित ,साक्षी विभुते, संगीता साळुंखे ,मुक्ता गवळी, महेश काशीद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते