दत्तात्रय जगदाळे यांचे उपोषण नवव्या दिवशी सांगता
औंध सह सोळा गाव पाणी प्रश्ना बाबत उपोषण

दत्तात्रय जगदाळे यांचे उपोषण नवव्या दिवशी सांगता
औंध-महेश यादव
औंधसह 16गावांच्या शेती पाणी प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांनी 20मार्चपासून सुरू केलेले आमरण उपोषण नवव्या दिवशी सोडण्यात आले.
सोळा गावांच्या शेती पाणी प्रश्नी जगदाळे यांनी आपल्या प्रमुख सात मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले होते. गुरूवारी उपोषणाच्या नवव्या दिवशी जगदाळे यांची तब्येत खालावली असून उपोषणस्थळी त्यांचेवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते.दरम्यान उरमोडी विभागाचे अभियंता अविनाश जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जगदाळे यांच्याशी चर्चा केली
या दरम्यान आचार संहिता सुरू असल्याने संबधित अधिकाऱ्यांनी सोळा गाव सर्व प्रमुख व अधिकारी याची मीटिंग लवकरात लवकर लावणार असे सांगितले.
या उपोषणस्थळी मागील आठ दिवसांत विविध मान्यवरांनी भेटी दिल्या
मागील 13वर्षे जगदाळे हे औंधसह 16गावे शेती पाणी प्रश्नी संघर्ष करत आहेत.मात्र त्यांचा हा लढा निर्णायक टप्प्यावर आला असताना काही घटकांनी यामध्ये जाणूनबुजून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रसंगी विविध मान्यवर, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.