मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हस्ते गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हस्ते गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ
सातारा -प्रतिनिधी
मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी आपल्या मुळ गावी दरे येथे दाखल झाले असुन त्यांनी गावातच जनता दरबार भरवून आलेल्या नागरीकांच्या समस्यांचा निपटारा करत शेतीत रमत वक्षांची लागवड केली गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ केला.जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ कोयना जलाशयामध्ये गाळाची भर आधीक होऊ लागली असुन हि सुपीक गाळ युक्त माती शेतीला अधिक उपयुक्त असुन शेतकर्यांनी हा गाळ माती काढुन आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधीक बळ मिळेल तर धरणातील गाळ माती कमी होऊन पाणी साठ्यात वाढ होईल त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुंख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला कांदाटी खोऱ्यातील युवकांच्या रोजगारासाठी व्हिजन तयार करा मुंख्यमंत्री यांनी जिल्हाप्रशासनाची बैठक घेऊन कांदाटी खोऱ्यासह या विभागातील युवकांना रोजगारासाठी शहराकडे जावे लागु नये यासाठी वनऔषधी पर्यटन बांबुलागवड मत्स्य व्यावसाय शेतीतील विविध प्रयोगांसाठी व्हिजन तयार करून आराखडा तयार करावा येथील रस्ते पुलांची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या आहेत गावात मुंख्यमंत्र्या समवेत पदाधीकारी आधीकार्यांसह नागरीकांची मांदीयाळी मुंख्यमंत्र्या सोबत विविध खात्यांचे सचिव जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पोलिस प्रमुख समीर शेख आमदार महेश शिंदे यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह हाजारो नागरीकांनी दरे या दुर्गम आणी छोट्याश्या गावामध्ये हजेरी लावली होती