पुसेसावळी येथील मुस्लिम युवकावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

पुसेसावळी येथील मुस्लिम युवकावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
प्रतिनिधी:- समद आत्तार .
पुसेसावळी येथील मुस्लिम समाजातील युवकाने इंस्टाग्राम या पोर्टल वरील पोस्ट ला केलेल्या कमेंट मध्ये भगवान श्रीराम, सितामाता आणि श्रीलक्ष्मण यांच्या बाबतीत अश्लील भाषेचा वापर करून अवमान केल्याची माहिती व्हाट्सअप वरून काही वेळातच तालुक्यासह पुसेसावळी आणि परिसरात व्हायरल झाली. त्यानंतर पुसेसावळी परिसरातील आणि तालुक्यातील बहुसंख्य हिंदू समाजातील युवकांनी संबंधित युवकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत औंध पोलीस स्टेशन येथे हजेरी लावली होती. त्यानुसार औंध पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
या झालेल्या अवमानकारक घटनेने हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे आज हनुमान मंदिर, पुसेसावळी येथे समस्त हिंदू बांधव यांनी ११ वाजता एकत्रितपणे उपस्थित होऊन निषेध करत शहरातून निषेध मोर्चा काढला .तसेच संबंधित युवकाने इंस्टाग्राम वर केलेल्या अवमानकारक पोस्ट मुळे व्हाट्सअप वरून निषेधात्मक पोस्ट तसेच स्टेट्स ठेवत निषेध नोंदविला जात आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून औंध पोलीस स्टेशन येथील पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पोलिस कर्मचारी यांनी संबंधित युवकास ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, सहायक फौजदार प्रशांत पाटील आणि सहकारी कर्मचारी यांनी तातडीने औंध पोलीस स्टेशन येथे हजेरी लावली. तसेच रात्री उशिरा म्हसवड येथील सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली.