पुसेसावळी येथील मुस्लिम समाजाने केला त्या आक्षेपार्ह पोस्ट चा निषेध केला.

पुसेसावळी येथील मुस्लिम समाजाने केला त्या आक्षेपार्ह पोस्ट चा निषेध केला.
प्रतिनिधी :समद आत्तार .
पुसेसावळी ता. खटाव येथील सर्व हिंदू मुस्लीम बांधव आजपर्यंत एकोप्याने रहात आलेले आहेत पुसेसावळी गावाला सुरवातीपासून हिंदू मुस्लीम ऐक्याची धार्मिक सामाजिक, आध्यात्मिक परंपरा आहे. एकमेकांच्या सुख-दुखा:त धावून जाणेची प्रथा अनेक पिढ्यांपासून या गावात चालत आलेली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी जो हिंदू देव-देवतांचा अवमान करणेचा निंदणीय आक्षेपार्ह प्रकार घडला, ज्या समाजकंटकाने दोन धर्मामध्ये जो तेढ निर्माण करणेचा प्रयत्न केला या गोष्टीचा पुसेसावळी मुस्लीम समाज तसेच जामा मस्जिद ट्रस्ट, पुसेसावळी कधीही समर्थन करीत नाही आणि करणारही नाही. ज्या समाजकंटकाकडून हा घाणेरडा प्रकार घडलेला आहे त्यास कठोर शासन झाले पाहिजे ही देखील आमची भूमिका असून घडलेल्या निंदनीय प्रकाराचा सर्व मुस्लीम समाजाकडून जाहीर निषेध करणेत येत असल्याबाबतचे निवेदन मा.तहसिलदार साहेब,खटाव, मा. उपविभागीय पोलिस अधीक्षक, दहिवडी कॅम्प, वडूज आणि मा.सहाय्यक पोलिस निरीक्षक, औंध यांना देण्यात आले.
झालेली घटना अतिशय निंदनीय असून त्याचा संपुर्ण मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात येत आहे. शिवाय संबंधित युवकास त्याच्या घरातील अथवा समाजातील कोणत्याही व्यक्तीने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला नव्हता व नाही. याऊलट संबंधित युवकावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी व्हावी तसेच दोशी आढळून आल्यास कठोर शिक्षा देण्याचीही मागणी समाजाकडून करण्यात आली आहे. परंतू हिंदू बांधवांनी एका युवकाच्या निषेधार्ह कृत्यामुळे संपूर्ण समाजाला वेठीस ठरणे योग्य नसल्याचे प्रशासनास सांगितले.
यावेळी पुसेसावळी येथील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि युवक उपस्थित होते.