आज मायणी येथे सदगुरू यशवंत बाबा महाराजांचा रथोत्सव

मायणी येथे सदगुरू यशवंत बाबा महाराजांचा रथोत्सव
मायणीः
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मायणीच्या सद्गुरु यशवंत बाबा यांच्या ९३ व्या पुण्यतिथी निमित्ताने आज शुक्रवार दि. ५ एप्रिल २०२४ रोजी रथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, विश्वस्त यशवंतबाबा देवस्थान ट्रस्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत रथ पूजन करण्यात येणार आहे. रथ पूजन नंतर बँड पथक, गजी व ढोल पथक, भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत यशवंत बाबांच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने गेल्या ३० तारखेपासून मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
रथ सोहळा व यात्रोत्सवानिमित्ताने मेवा मिठाई, पाळणे, सौंदर्यप्रसाधने व इतर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. तसेच यशवंत बाबा महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यात्रेच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी, मायणी ग्रामपंचायत, यशवंतबाबा देवस्थान ट्रस्ट, यशवंतबाबा भजनी मंडळ, दक्षता समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत बाबांचे भक्तगण विशेष परिश्रम घेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व मायणी पोलीस विभागाच्या वतीने यात्रेत योग्य ती दक्षता घेतली जात आहे.