तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनाचा घेतला असंख्य विद्यार्थ्यांनी लाभ

तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनाचा घेतला असंख्य विद्यार्थ्यांनी लाभ
मायणी : प्रतिनिधि
सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत पंचायत समिती खटाव यांच्यातर्फे महावाचन उत्सव 2024 अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यनिमित्ताने दादासाहेब गोडसे वरिष्ठ महाविदयालय सभागृह येथे आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनास तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेच्या असंख्य विदयार्थ्यांनी भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व त्यांनी ज्ञानसंपन्न बनावे यासाठी शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महावाचन उत्सव अंतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना पुस्तके पाहता व खरेदी करता यावी यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग व नगरसेवक अभय देशमुख यांच्या संकल्पनेतून या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे विस्ताराधिकारी संगीता गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. अध्यक्ष डॉ.अरुणा बर्गे, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचनाची गोडी लावावी याविषयी मार्गदर्शन केले.कराड येथील विजया बुक वितरणचे प्रमुख श्री. जोशी यांनी प्रदर्शनासाठी विविध ग्रंथ उपलब्ध करून दिले.
यानिमित्ताने तालुक्यातील लेखक व कवी बाळासाहेब कांबळे,किरण अहिवळे, कुंदा लोखंडे,प्रकाश शिंदे,रंजना सानप,सीमा मंगरुळे,अंजली गरवारे यांचा पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास विस्तार अधिकारी जाधव साहेब, नगरसेवक अभय देशमुख,प्राचार्य जे एस जाधव,अशोक देशमुख,नवनाथ जाधव,विश्वंभर रणनवरे,एल आर जाधव,जयकर खाडे,आबासाहेब जाधव,हरिबा दडस,प्रमोद खाडे,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक ,शिक्षक, पालक , उपस्थित होते. केंद्र प्रमुख राजेंद्र बागल यांनी सूत्रसंचालन केले.विस्ताराधिकारी सुतार साहेब यांनी आभार मानले.