मांजरवाडी येथील यात्रेत हरवलेला मोबाईल पुसेगाव पोलिसांना मिळवण्यात यश

मांजरवाडी येथील यात्रेत हरवलेला मोबाईल पुसेगाव पोलिसांना मिळवण्यात यश
पुसेगाव प्रतिनिधी
मांजरवाडी ता .खटाव येथील मस्कोबा यात्रेमध्ये गर्दीत हरवलेला मोबाईल मिळवण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले
महेश अंकुश भोसले राहणार पांढरवाडी पो .डिस्कळ हे यात्रेमध्ये देव दर्शनाला गेले असताना यांचा खरेदी केलेला विवो कंपनीचा मोबाईल दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी मौजे मांजरवाडी तालुका खटाव येथील श्री म्हस्कोबा यात्रेमध्ये गर्दीत हरवला होता. त्यांनी लगेच पुसेगाव पोलीस ठाणे येथे मोबाईल हरवलेची तक्रार दाखल केली होती. त्याबाबत सायबर सेलच्या महिला अंमलदार अमृता चव्हाण यांनी सहा.पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयातून तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे विश्लेषण करून डी बी पथकातील अंमलदार सुनील अब्दागिरे यांचे मदतीने सदर मोबाईल रिकवर केला, त्याबाबत तक्रारदार यांना अवगत करून आज रोजी तक्रारदार यांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत देण्यात आला आहे. त्याबाबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो कोरेगाव व मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी पुसेगाव पोलीस ठाणेचे अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.