चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा औंध पोलिसांनी आवळल्या मुसक्या
२,४७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा औंध पोलिसांनी आवळल्या मुसक्या
२,४७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
पुसेसावळी प्रतिनिधी :- समद आतार
औंध पोलीस ठाणे हद्दीत मौजे उंचीठाणे ता. खटाव जि. सातारा गावचे हद्दीतील फिर्यादीच्या मळा नावचे शिवरातील शेतीतील शेडमध्ये असलेल्या दोन बोकड किंमत रुपये २७०००/- ची ही फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेहली होती म्हणून वगैरे मजकुराचे खबरीवरून औंध पोलीस स्टेशन गु.र.नं. १५९/२०२३ भा.द.वि.स.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी गुन्हा घडलेपासुन वेळोवेळी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे औंध पोलीस ठाणेचे प्रभारी स.पो.नी. दत्तात्रय दराडे व त्यांचे सहकाऱ्यांनी सदर दाखल गुन्ह्याबाबत घटनास्थळी जाऊन बारकाईने माहिती घेऊन तसेच गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपी निष्पन्न करून सदर आरोपीस पुसेसावळी ते गोरेगाव वांगी जाणारे रोडवर सापळा रचून गुन्ह्यातील चोरीस गेले मुद्देमालासह आरोपीस अवघ्या ३ तासात आरोपीस अटक केली.
आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली ओमनी गाडी किंमत रुपये १,५०,०००/- एक मोटर सायकल किंमत रुपये ७०,०००/- दोन बोकड किंमत रुपये २७,०००/- असा एकूण २,४७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास श्री समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक सो. सातारा, श्री बापु बांगर, मा. अपर पोलीस अधीक्षक, अश्विनी शेडगे मा. उपविभागीय पोलीस अधि. दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे दत्तात्रय दराडे सहा.पोलीस निरीक्षक, आर. एस. वाघ, पी पी पाटील, के. एन. हिरवे, पी. एस इंगळे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सो. सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो. सातारा यांनी अभिनंदन केले आहे.