औंध येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

औंध येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
औंध— प्रतिनिधी
औंधमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त औंध मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते .त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारणा पुढे नेण्याच्या विचारार्थ सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुढील पिढी सुदृढ आणि निरोगी व्हावे व त्यांच्या आरोग्य संबंधी योग्य ती माहिती त्यांना मिळावी यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरात सरासरी 300 लोकांनी सहभागी नोंदवला .आरोग्य शिबिर हे अध्यक्ष विजय रणदिवे तसेच अमित रणदिवे कुलदीप इंगळे, धनंजय रणदिवे ,राजवीर रणदिवे, युवराज रणदिवे, मीना रणदिवे ,बाळासाहेब रणदिवे यांनी या शिबिरास मेहनत घेतली तसेच समस्त बौद्ध समाज ,समता युवक संघ ,सावता माळी मंडळ औंध ,अण्णाभाऊ साठे मंडळ औंध, नाभिक महामंडळ ,ज्योतिर्लिंग मंडळ, गुरव समाज, मुस्लिम समाज, विश्वकर्मा संघटना, कोल्हाटी समाज व सर्व बहुजन समाजाने या मध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित रणदिवे यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सरपंच सौ सोनाली मिठारे ,उपसरपंच दीपक नलवडे, हणमंत शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य वसंत पवार, पोलीस स्टेशन विभागाचे प्रमुख केंद्र साहेब उपस्थित होते